Chaitra Navratri Yearly Horoscope: चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला म्हणजेच ९ एप्रिलला चैत्र नवरात्री सुरु होत आहे. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा सुद्धा असतो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके १९४६ शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे. यंदा गुढी पाडवा व चैत्र नवरात्रीच्या मुहूर्ताला अनेक ग्रहांची शुभ युती होणार आहे. गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शश राजयोग, अमृत सिद्धी योग व सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र नवरात्रीत काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. लक्ष्मीचे या राशींमधील वास्तव्य पुढील १ वर्ष कायम असणार आहे. या कालावधीत या चार राशी दोन्ही हातांनी व चहूबाजूंनी धनसंचय करू शकतील. तुमच्या राशीत हा श्रीमंतीचा योग आहे का, हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चैत्र नवरात्रीपासून वर्षभर ‘या’ रूपात तुमच्या दारी येईल माता लक्ष्मी?

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीसाठी यंदाचे नववर्ष हे आत्मविश्वास व प्रगती घेऊन येणारे असेल. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये निपुण आहात पण केवळ न बोलल्याने मागे राहत होतात त्याच गोष्टी आता तुमची ओळख ठरतील. तुमची वाणी व विश्वास तुमच्या आर्थिक फायद्याचे माध्यम ठरणार आहेत. कुटुंबातील आजारी व्यक्तींची प्रकृती सुधारल्याने डोक्यावरील मोठा ताण निघून जाईल. वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी नवनवीन संपर्क जोडता येतील. वडिलांची भक्कम साथ लाभल्याने काही संकटे सहज पार करता येतील. मागील काही दिवसात अडकून पडलेले पैसे पुन्हा मिळवता येतील.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

नवीन वर्ष हे वृश्चिक राशीसाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. आरोग्याची स्थिती सुधारेल. वैवाहिक नात्यातील गोडवा वाढू शकतो. या कालावधीत तुम्हाला तुमचं म्हणणं सिद्ध करावं लागू शकतं पण यातून तुमच्या यशाची दारे पूर्ण उघडण्याची संधी सुद्धा मिळू शकते. या राशीच्या मंडळींना धन- प्राप्ती ही आई, बहीण, पत्नी, मैत्रीण या नात्यांमधून थोडक्यात ‘स्त्री’च्या रूपात होऊ शकते. संतती सुखाची चिन्हे आहेत. या कालावधीत आर्थिक मिळकतीची जुन्या गुंतवलेल्या पैशांची सुद्धा मदत होईल.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीच्या मंडळींना वाडवडिलांच्या संपत्तीचा मोठा वाटा मिळू शकतो. एखादी प्रॉपर्टी विकून तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक फायदा कमावता येऊ शकतो. या कालावधीत नोकरीत बदल करण्याचा विचार मनात येऊ शकतो, थोडा जोर लावून प्रयत्न केल्यास तशा संधी सुद्धा वाट्याला येतील. कामाची पोचपावती मिळेल. भावंडांची व मित्रांची साथ महत्त्वाची ठरेल. भागीदारीच्या कामातून फायदा संभवतो. आर्थिक मिळकतीसह मानसिक आरोग्यासाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी वेळ काढावा लागेल.

हे ही वाचा<< ७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मन आनंदी राहील. मकर राशीला त्यांच्या चेहऱ्यावरील हरवलेले हसू परत मिळवून देणारे हे वर्ष असणार आहे. कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखून तुम्ही काम करून घेऊ शकता. मकर राशीच्या मंडळींना हे वर्ष समाधान मिळवून येणारे असेल. कामामध्ये स्पष्टता आल्याने अनेक न सुटणारे पेच सोडवू शकाल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. बचत करण्यात यश लाभेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitra navratri 2024 from gudhi padwa lakshmi blessing these four zodiac signs over next 365 days how you will earn money svs