1 to 7 April 2024 Weekly Horoscope: एप्रिल महिना हा सणांचा- उत्सवाचा महिना असणार आहे. या उत्सवांची सुरुवात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. १ ते ७ एप्रिल या कालावधीत ग्रहांचे बळ वाढणार आहे. या पहिल्या आठवड्यात मीन राशीत शुक्र, बुध व सूर्याच्या मिलनाने त्रिगही योग निर्माण होऊ शकतो. याशिवाय या आठवड्यात बुधादित्य योग व लक्ष्मी नारायण राजयोग सुद्धा निर्माण होणार आहे. या शुभ योगाचा प्रभाव १२ राशींवर होणार आहे. काही राशींचे नशीब चमकणार आहे, तर काहींना थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नेमकं मेष ते मीन राशीच्या नशिबात या आठवड्यात काय लिहून ठेवलंय, पाहूया.

१ ते ७ एप्रिल २०२४ चा आठवडा मेष ते मीन राशींसाठी कसा असणार?

मेष रास: मेष राशीसाठी लाभाची दारे उघडण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत काहीशी जोखीम पत्करावी लागेल. वैवाहिक जोडीदाराची साथ लाभेल.

Shani To Open Locker Of Money On Buddha Pornima on 23rd May
शनी खजिन्याचं कुलूप बुद्ध पौर्णिमेला उघडणार; ‘या’ ४ राशींना मिळणार मोठा वाटा, श्रीमंतीसह ‘हे’ लाभ करतील भरभराट
Shani Maharaj Finally To Leave Kumbh Rashi At 2025 Till 2027
शनी महाराज ‘या’ दिवशी घर सोडणार; २०२७ पर्यंत गुरुकडे राहून ‘या’ ३ राशींना देणार अपार संपत्ती; यश पायाशी घालेल लोटांगण
After 100 years Navpancham Raja Yoga was created Jupiter and Ketu
सुखाचे दिवस येणार! गुरू आणि केतू ‘या’ तीन राशींचे चमकवणार भाग्य; सिंह राशीत निर्माण झाला ‘हा’ दुर्मीळ राजयोग
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
shukra gochar 2024 venus transit in krittika nakshatra positive impact on these zodiac sign
शुक्रकृपेने सहा दिवसांनंतर ‘या’ ३ राशी होणार मालामाल!कृत्तिका नक्षत्रातील प्रवेशाने वाढेल मान-सन्मान अन् प्रतिष्ठा?
374 Days Later Guru Enters In Shukra Rashi Big Changes Till 2025 The Kundali Of 3 Rashi Can become Billionaire
३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक
From May To August Shani Maharaj Walk With Golden Feet In Kundal
सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत
Trigrahi Yog in Aries
त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ ५ राशींना होणार अपार धनलाभ? ३ ग्रहांच्या युतीने लक्ष्मी येऊ शकते दारी

वृषभ रास: आरोग्याची काळजी घ्या, पोटदुखीचा त्रास संभवतो, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. डोकं व मन शांत राहूद्या, निर्णय घेताना जोडीदाराला विश्वासात घ्यायला विसरू नका.

मिथुन रास: आर्थिक मिळकतीचे स्रोत बळावतील. प्रगतीच्या संधी तुम्हाला वाणीच्या बळावर प्राप्त कराव्या लागणार आहे. व्यावसायिकांसाठी हा कालावधी फायद्याचा असेल. आयुष्यात काहीसे चढ- उतार येऊ शकतात. भांडणांपासून दूर राहा, ताण वाढू शकतो.

कर्क रास: हा आठवडा आपल्यासाठी सर्वात शुभ आहे. पद, पैसे, प्रतिष्ठा आपल्या हाती येईल. सामाजिक कामातील रुची वाढेल. प्रेमसंबंध जपताना ओढाताण होऊ शकते.

सिंह रास: आरोग्याची हेळसांड करू नका. लहानशी समस्या सुद्धा वाढून मोठी होऊ शकते. आयुष्यात काही अडथळे येऊ शकतात. आठवड्याच्या सरतेशेवटी मात्र आनंदाची वार्ता कानी येऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना संधी मिळू शकते.

कन्या रास: या आठवड्यात नशीबच तुमचं दार ठोठावू शकतं. आपल्या कामाचं महत्त्व सर्वांच्याच लक्षात येईल, तुमच्या प्रभावाने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. खासगी आयुष्यात सुख शांती व प्रेम अनुभवता येईल.

तूळ रास: मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभाचे संकेत आहेत. दिखाव्यापासून दूर राहा. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा. उच्च पदावरील वरिष्ठांशी संबंध जपून ठेवा.

वृश्चिक रास: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याला कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. आपल्या कामाला वेग येईल. आरोग्यातही सुधारणा होऊ शकते. घरी व कुटुंबात शांतता राहिल.

धनु रास: वैयक्तिक संबंध सुधारतील. आपल्या जोडीदारासह वेळ घालवता येईल. जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. आरोग्य व व्यवहार जपून करावा.

मकर रास: या आठवड्यात धैर्याने संकटाला सामोरे जा. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो. घाई गडबडीत काम करू नका. बाहेर खाणं टाळावं.

कुंभ रास: संतुलन साधून राहावे लागेल. धैर्याने तुम्ही गोष्टी हाताळल्यास विनाकारण होणारा मनस्ताप टाळता येऊ शकतो. वरिष्ठांशी विनाकारण भांडण करू नका. आर्थिक नुकसान होऊ शकते पण कुटुंबातील आनंद तुमची सगळी चिंता दूर करेल.

हे ही वाचा<< ३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

मीन रास: आपण बरीच वर्षे करत असलेली मेहनत तुम्हाला या आठवड्यात यशाच्या वाटेवर पुढे जाण्याची संधी देईल. प्रमोशन, पगारवाढ, होण्याचे योग आहेत. आपल्याला आयुष्यात प्रेमाची गोडी अनुभवता येऊ शकते, गोष्टी गृहीत धरू नका, नेटाने कृती करण्यावर भर द्या.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)