Numerology Mulank 8 : जन्मतारखेlची बेरीज केल्यानंतर जो अंक मिळतो तो आपला मूलांक असतो. मूलांक हा व्यक्तिबद्दल बरेच काही सांगतो. जसे प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आणि इष्टदेवता असते तसेच प्रत्येक मूलांकाचाही एक ग्रह स्वामी असतो. मूलांकाचे स्वामी ग्रहाचा त्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. आज आपण ८ मूलांकाबाबत जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूलांक ८

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १७,८, २६ तारखेला होतो त्याचा मूलांक ८ असतो. अंक ज्योतिष्यनुसार मूलांक ८ असलेले लोक आयुष्यामध्ये मोठे व्यवसायिक आणि यशस्वी राजनेता होतात

शनीचा प्रभाव

मूलांक ८ ग्रहाचा स्वामी शनी ग्रह आहे. ज्यामुळे मूलांक ८च्या लोकांवर शनीचा प्रभाव होतो. मूलांक ८ असणारे लोक अत्यंत मेहनती, गंभीर आणि दुरदर्शी असतात. हे लोक संकटाना घाबरत नाही पण त्यांचा सामना करतात.

पंतप्रधान मोदींचा मूलांक देखील आहे ८

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूलांक देखील ८ आहे. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर रोजी झाला. मोदीजी केवळ देशाचे पंतप्रधान आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात अडचणींमधून जात संपूर्ण जगात नाव कमावले.

बिझनेस टायकून

८ मूलांक असलेले लोक व्यवसायात खूप यशस्वी होतात आणि बिझनेस टायकून होतात. यासह, हे लोक समाजात खूप आदर मिळवतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulank 8 personality people born on this date become big businessman and famous political leaders get money snk