छत्रपती संभाजीनगर : माजी आमदार सुभाष माणकचंद झांबड यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला विशेष अर्ज (स्पेशल लिव्ह पिटिशन) मागे घेतला. तत्पूर्वी झांबड यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि सुधांशू जोशी यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करायचा असल्याने हा अर्ज मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. सुनावणीवेळी न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. मनोज मिश्रा यांनी अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली. सुभाष झांबड पोलिसांसमोर हजर झाले आणि त्यांनी पुन्हा जामीन अर्ज केल्यास संबंधित न्यायालयाने तात्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : साखळदंडाने बांधलेल्या विवाहितेची मुलासह मुक्तता, आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग

माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बँकेचे अध्यक्ष असून, बँकेमधील ९८ कोटी ४१ लाख व २१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ऑक्टोबर २०२३ मध्ये दाखल असून, दुसरा गुन्हा हा २०२४ मधील नोव्हेंबरमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालाय आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे त्यांच्या अर्जावरील सुनावणीवेळी झांबड स्थानिक पोलिसांसमोर हजर झाले आणि पुन्हा जामिनासाठी अर्ज केल्यास त्यावर न्यायालयाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात ठेवीदारांच्या वतीने ॲड. अमोल कारंडे, ॲड. विकास तानवडे हे काम पाहात आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajanta urban bank 97 crores fraud former mla subhash zambad supreme court petition withdrawn css