धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 36 उमेदवारांनी एकूण ५० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एका उमेदवाराचे दोन अर्ज छाननीदरम्यान बाद झाले आहेत. आता उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. सोमवार, २२ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी आर्यनराजे शिंदे (अपक्ष),राजकुमार पाटील (अपक्ष), संजयकुमार वाघमारे (बहुजन समाज पार्टी),विलास घाडगे (अपक्ष), शामराव पवार (समनक जनता पार्टी), नवनाथ उपळेकर (अपक्ष), ॲड.विश्वजीत शिंदे (आदर्श संग्राम पार्टी), हनुमंत बोंदर (अपक्ष), योगीराज तांबे (अपक्ष),उमाजी गायकवाड (अपक्ष), सौ.अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नेताजी गोरे (अपक्ष), समीरसिंह साळवी (अपक्ष), काकासाहेब खोत (अपक्ष), बाळकृष्ण शिंदे (अपक्ष), भाऊसाहेब आंधळकर (अपक्ष), सोमनाथ कांबळे (अपक्ष),गोवर्धन निंबाळकर (अपक्ष), काका कांबळे (अपक्ष), शेख नौशाद इकबाल (स्वराज्य शक्ती सेना पार्टी),राम शेंडगे (अपक्ष), नितीन मोरे (अपक्ष),अरुण जाधवर (ओबीसी बहुजन पार्टी),सिद्दीक इब्राहीम बोडीवाले (ऑल इंडिया मजलिस ए इलेहादुल मुस्लिमीन), वर्षा कांबळे (अपक्ष),भाऊसाहेब बेलुरे (अपक्ष), नितीन गायकवाड (अपक्ष) या २७ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले. राजकुमार पाटील, अर्चना पाटील, नेताजी गोरे व ॲड.विश्वजीत शिंदे या उमेदवारांनी दोन व तीन नामांकन अर्ज दाखल केले आहे.शेवटच्या दिवसअखेर ३६ उमेदवारांनी एकूण ५० नामनिर्देशनपत्र दाखल केले. शेवटच्या दिवशी ६ व्यक्तींनी २० अर्जांची खरेदी केली.

हेही वाचा : विद्यापीठ परिसरात आग; अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत ७५ व्यक्तींनी १७५ अर्ज खरेदी केले होते. शनिवारी छाननी करण्यात आली छाननी दरम्यान अपक्ष उमेदवार वर्षा कांबळे यांचे दोन उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारी अर्जावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिनिधी कडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र हा आक्षेप फेटाळून लावण्यात आल्यामुळे आंधळकर यांची उमेदवारी कायम राहिली आहे. सोमवार २२ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात त्यानंतर किती उमेदवार शिल्लक राहतात हे पहावे लागेल.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usmanabad lok sabha election 2024 nomination forms 35 candidates contesting css