Traffic Rules: रस्त्यावरून वाहन घेऊन प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने तुमचे चलान कापले जाऊ शकते. एवढेच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला तुरुंगवासही होऊ शकतो. मात्र, अनेक वेळा असे घडते की लोकांना काही नियमांची माहिती नसते आणि ते नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. ही देखील गंभीर बाब आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती असायला हवी. आज आम्ही तुमच्यासाठी अशा वाहतूक नियमाची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे उल्लंघन केल्यास तुमचे १० हजार रुपयांचे चलान कापले जाऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा नियम आपत्कालीन वाहनांना मार्ग देण्याशी संबंधित आहे. सध्याच्या वाहतूक नियमांनुसार, कोणत्याही मोटार वाहन चालकाने आपत्कालीन वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. म्हणजेच, जर तुम्हाला मार्गावर एखादे आपत्कालीन वाहन दिसले, जे तुमच्या मागे आहे, ते ताबडतोब ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता द्यावा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचे चलान कापले जाऊ शकते. या नियमाचे उल्लंघन करू नका. असे करताना पकडले गेल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

(हे ही वाचा: सर्वात स्वस्त ७ सीटर कार! लूक एकदम नवीन, पेट्रोलसोबत CNG चाही पर्याय उपलब्ध)

अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका अशा आपत्कालीन वाहनांना मार्ग देणे बंधनकारक आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ अंतर्गत, वाहनचालकांना आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. सुधारित एमव्ही कायद्याच्या कलम १९४ (इ) अंतर्गत चलान कापले जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you not giving clean way to fire brigade vehicles and ambulances challan of worth rs 10000 will cut ttg