Cheapest Car Loan: स्वतःची कार घेणे हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी काही लोक बँकांकडून कर्ज घेतात. बँकेकडून कर्ज घेऊन कार घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करता येईल. नवीन कार खरेदी करण्यासाठी, किमान सात टक्के दराने आठ वर्षांसाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते. तुम्हाला कारच्या किमतीच्या ९०-१०० टक्के फायनान्स मिळू शकतो. कोणत्या बँका उत्तम दरात कार कर्ज देत आहेत ते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

बँक ऑफ बडोदामध्ये, तुम्ही नवीन कारसाठी किमान सात टक्के दराने कर्ज मिळवू शकते. कार कर्जावर, बँक अतिरिक्त प्रक्रिया शुल्क म्हणून १५०० रुपये अधिक GST आकारत आहे.

(हे ही वाचा: २०२२ मारुती सुझुकी बलेनो नवीन अवतारात होणार लॉंच! जाणून घ्या हाय-टेक फीचर्सबद्दल)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्याही प्रक्रिया शुल्काशिवाय ७.२० टक्के दराने कार कर्ज देत आहे. तथापि, नवीन कारसाठी कर्जावरील प्रक्रिया शुल्क या महिन्याच्या अखेरीस म्हणजे ३१ जानेवारी २०२२ पर्यंतच माफ करण्यात आले आहे.

कॅनरा बँक (Canara Bank)

तुम्ही कॅनरा बँकेकडून ७.३० टक्के दराने कार कर्ज घेऊ शकता. यावर, कर्जाच्या रकमेच्या ०.२५ टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल, ज्याची किमान मर्यादा १ हजार रुपये आणि कमाल मर्यादा ५ हजार रुपये आहे.

(हे ही वाचा: Mahindra Scorpio 2022 नव्या रुपातच नाही तर नवीन नावासह होणार लॉंच!)

अॅक्सेस बँक (Axis Bank)

खाजगी क्षेत्रातील बँक अॅक्सेस बँक देखील स्वस्त दरात कार कर्ज उपलब्ध करून देत आहे. येथून तुम्ही किमान ७.४५ टक्के दराने कर्ज घेऊ शकता. कार कर्जासाठी ३५००-७००० रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.

(हे ही वाचा: हिरो XPulse 200 4 Valve अॅडवेंचर बाईकच्या दुसऱ्या बॅचची बुकिंग सुरू!)

कोणाला मिळू शकते कार कर्ज?

कार कर्ज मिळविण्यासाठी सर्व बँकांचे स्वतःचे पात्रता निकष आहेत. बहुतांश बँकांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत.

१. कर्ज अर्जदाराचे वय १८-७५ वर्षे असावे.

२. मासिक उत्पन्न किमान २० हजार रुपये असावे.

३. सध्याच्या नियोक्त्याशी ( एंप्लॉयर ) किमान १ वर्ष संबंधित असावे.

४. कोणत्याही सरकारी कंपनीत किंवा खाजगी कंपनीत पगारदार किंवा स्वयंरोजगार असावा.

(इनपुट: bankbazaar.com)

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thinking of buying a new car find out which bank offers the cheapest loan ttg