Maruti Suzuki Baleno Alfa Finance Details: मारुती सुझुकी बलेनो ही प्रीमियम हॅचबॅक आहे ज्याच्या किमती ६.५६ लाख, एक्स-शोरूम पासून सुरू होतात. जे लोक चांगले लूक आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज फॅमिली कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी बलेनो हा एक चांगला पर्याय आहे. बलेनो ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे आणि तिचे अल्फा व्हेरियंट तिच्या लूकसाठी आवडते आणि टॉप सेलर देखील आहे. तुम्ही या फॅमिली हॅचबॅकला फायनान्स देखील करू शकता. जर तुम्ही Baleno Alpha व्हेरियंटला दोन लाख रुपयांचे डाउनपेमेंट करून फायनान्स केले तर कर्ज आणि EMI यासह इतर महत्त्वाच्या गोष्टी काय असतील, हे आज जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maruti Suzuki Baleno Alfa दोन लाखात घरी आणा

Maruti Suzuki Baleno, Baleno Alpha च्या सर्वाधिक विक्री व्हेरिएंटची किंमत ९.२८ लाख रुपये एक्स-शोरूम आणि १०,४८,५६० रुपये ऑन-रोड आहे. जर तुम्ही Baleno Alpha ला २ लाख रुपये डाऊनपेमेंट करून फायनान्स केले तर तुम्हाला ८,४८,५० रुपये कर्ज घ्यावे लागेल.

(हे ही वाचा: ‘या’ कारची Alto आणि Swift वर मात, किंमत फक्त ६.५६ लाख, मायलेज २२.३५ kmpl)

Maruti Suzuki Baleno Alfa EMI किती?

मारुती सुझुकी ५ वर्षांसाठी बॅलेनो अल्फा व्हेरिएंटचे कर्ज देते आणि व्याज दर ९ टक्के आहे, त्यानंतर तुम्हाला पुढील ६० महिन्यांसाठी १७,६१५ रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. Baleno Alpha वर २ लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटसह ५ वर्षांपर्यंतचे कर्ज घेतल्यास २ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज लागेल.

Maruti Suzuki Baleno Alfa फीचर्स आणि मायलेज

मारुती सुझुकी बलेनोच्या अल्फा व्हेरियंटचे मायलेज २२.३५ kmpl आहे. ५ सीटर कार मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल सीट्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, अलॉय व्हील आणि ABS यांसारख्या प्रमुख वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakhs and bring the maruti baleno alpha home know how much will be the emi pdb