World’s first flying car: चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या उडत्या गाड्या प्रत्यक्षातही असू शकतात, असा विचार तुमच्या मनात कधी डोकावलाय का? पण, स्वप्नवत वाटणारी ही बाब आता प्रत्यक्षात उतरली आहे. अमेरिकेच्या अलेफ एरोनॉटिक्स (Alef Aeronautics) कंपनीने जगातील पहिल्या उडत्या कार मॉडेल झिरोचा (Model Zero) व्हिडीओ शेअर केला आहे. ही गाडी हवेत उडताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही कार eVTOL (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अ‍ॅण्ड लँडिंग) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, म्हणजेच ती रनवेशिवाय सरळ वर टेकऑफ करू शकते. एखाद्या कारप्रमाणे सामान्य डिझाइन असणाऱ्या या कारची किंमत सुमारे २.६२ कोटी रुपये इतकी आहे.

‘या’ गाडीची कार्यप्रणाली कशी?

Alefची मॉडेल झिरो ही एक इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आहे, जी ड्रोनप्रमाणे सरळ हवेत वर उडू शकेल अशा रीतीने डिझाइन केलेली आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये ही कार प्रथम रस्त्यावरून पुढे जाते आणि नंतर काही सेकंदांत ती वर येऊन हवेत उडताना दिसते.

या कारमध्ये काय खास आहे?

या उडत्या कारचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती रस्त्यावरून सरळ वर येऊ शकते, तिला हेलिकॉप्टरसारखी जागा लागत नाही. कारमध्ये आठ मोटराइज्ड रोटर्स बसवलेले आहेत, जे कारच्या बॉडीमध्ये दडलेले आहेत. त्याशिवाय कारच्या बॉडीमध्ये एक मेश (Mesh) डिझाइन आहे, जी हवेत संतुलन राखते. या कारची कमाल गती ४० किमी/तास आहे आणि ती एकदा चार्ज केल्यावर ३२० किमीपर्यंत धावू शकते. त्याच वेळी फ्लाइट मोडमध्ये ही कार १६० किमी अंतर कापू शकते.

कधी येणार बाजारात?

‘अलेफ एरोनॉटिक्स’ने घोषणा केली आहे की, ते लवकरच Model A चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहेत. आतापर्यंत ३,३३० हून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत आणि २०२५ मध्ये उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर कंपनी २०३५ पर्यंत Model Z नावाची चार आसनी फ्लाइंग कार लाँच करण्याची योजना आखत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds first flying car price worth rs 2 62 crore launched by alef aeronautics american company shared video dvr