Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. केंद्र सरकारने टॅक्सची जुनी व्यवस्था आता बंद केली आहे. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, कोणकोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणकोणत्या वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोने, चांदी आणि प्लॅटिनम आता महागणार आहे. तसेच सिगारेट देखील महागणार आहे. कारण सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढून आता १६ टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांना सिगारेसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. देशी किचन चिमणी देखील महागणार आहे.

हेही वाचा : Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

काय स्वस्त होणार?

मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स स्वस्त होतील.
एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित उपकरणं स्वस्त होतील. अलिकडेच टीव्हीच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल स्वस्त होतील.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2023 gold silver platinum will become expensive custom duty on cigarettes increased asc