How To Link Aadhaar Card with Bank Account : आधार कार्ड हा असा एक कागदपत्र आहे; जो प्रत्येक भारतीय नागरिकाची ओळख पटवून देतो. त्यात १२-अंकी युनिक आयडेंटिटी नंबर (UID) आणि व्यक्तीचे नाव, पत्ता, जन्मतारीख, बायोमेट्रिक्स इत्यादी अनेक महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे शाळा, कॉलेज, असो किंवा ऑफिसात प्रवेश घेताना किंवा अगदी लाडक्या बहीण योजेनचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी सुद्धा आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असावेच लागते. त्यामुळे जर एखाद्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत नसतील अनेक जण तुम्हाला “अरे तुझं अजून आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक नाही केलंस का” असा सहज विचारून जातात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करण्याची प्रोसेस तुम्हाला माहिती नसेल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

कारण – सरकारने आधार कार्डला अन्य कागदपत्रं आणि बँक अकाउंटशी जोडणे अनिवार्य केले आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की,
आधार कार्ड नक्की कोणत्या कोणत्या कागदपत्रांशी लिंक करावं लागतं? तर आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे. मोबाइल नंबर लिंक असल्यास आधार कार्डवर डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करणे खूपच सोपे जाते.

आधार कार्ड कोणत्या कागदपत्रांशी लिंक करावं लागतं? (What should be linked with an Aadhaar card)

मोबाईल नंबर, बँक अकाउंट, आधार विमा पॉलिसी, पॅन, युएएन, पीएफशी, आधार मतदार ओळखपत्र, एलपीजी कनेक्शन, रेशन कार्डशी लिंक करा. कारण – विविध सेवा आणि फायदे मिळविण्यासाठी तुमचे इतर कागदपत्रांशी आधार कार्डशी लिंक करणे महत्त्वाचे झाले आहे.

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे? (How To Link Aadhar Card To Bank Account)

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०१७ मध्ये सर्व बँक खात्यांना आधारशी जोडण्याचे निर्देश दिले होते. तरीही, सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ च्या निर्णयानंतर, आता तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी जोडणे बंधनकारक आहे. पण, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी अजूनही जोडले नसेल तर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने ते करू शकता.

  • इंटरनेट बँकिंग
  • बँकेच्या मोबाइल ॲप्लिकेशन
  • जवळच्या बँक शाखा
  • एटीएम
  • एसएमएस सेवा आणि तुमच्या मोबाइल नंबरचा सुद्धा वापरू करून आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक करू शकता.

इंटरनेट बँकिंगद्वारे आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करायचे? (How to Link Aadhaar with Bank Account via Internet Banking)

  • तुमच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलला भेट द्या.
  • “Update Aadhaar” पर्याय शोधा.
  • आधार नोंदणी करण्यासाठी तुमचा प्रोफाइल पासवर्ड तिथे टाका.
  • तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दोनदा टाइप करण्यास सांगितले जाईल.
  • “सबमिट करा” पर्यायावर क्लिक करा.

एसएमएसद्वारे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करावे? (Linking your Bank Account with Aadhaar Through SMS Service)

  • तुम्हाला या स्वरूपात एक संदेश टाइप करावा लागेल.
  • तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून ‘५६७६७६’ वर हा संदेश पाठवा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आधार कार्ड लिंक करण्याबाबत तुम्हाला एक संदेश दिला जाईल.

मोबाईल ॲपद्वारे बँक खाते आधार कार्डशी कसे लिंक करायचे? (Linking Bank Account with Aadhaar Through Mobile App)

  • तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करा
  • ‘Services’ टॅबवर क्लिक करा.
  • ‘‘View / Update Adhaar card detail’ हा पर्याय शोधा.
  • तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दोनदा टाइप करण्यास सांगितले जाईल.
  • ‘Submit करा’ पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आधार कार्ड लिंकबाबत संदेश पाठवला जाईल.

शाखेद्वारे बँक खाते आधारशी कसे लिंक करायचे (How to Link Bank Account with Aadhaar via Branch)

तुम्ही तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करण्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत लेखी विनंती करावी लागेल किंवा संबंधित फॉर्म सादर करावा लागेल. पडताळणीसाठी तुमचे मूळ आधार कार्ड आणि त्याची एक प्रत सोबत ठेवावी.

तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करू शकता…