मुंबई : महागाईची आकडेवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला. परिणामी निर्देशांकातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांचे समभाग घसरले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३६.१८ अंशांनी घसरून ८१,२८९.९६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३१४.५ अंश गमावत ८१,२११.६४ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९३.१० अंशांची घसरण झाली आणि तो २४,५४८.७० पातळीवर बंद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतर्गत आघाडीवर महागाई कमी होण्याचा अंदाज असला तरी, गुंतवणूकदार खाद्यान्न आणि भाज्यांच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवून आहेत, जे भविष्यातील महागाई दर ठरवतील. दरम्यान, अमेरिकेतील महागाई दर अपेक्षेनुरूप राहिल्याने येत्या आठवड्यात होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत दर कपातीची आशा वाढली आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटी निर्देशांकाने उच्चांकी पातळी गाठली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, मारुती, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि स्टेट बँकेच्या समभागात घसरण झाली. तर भारती एअरटेल, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या समभागांची कामगिरी समाधानकारक राहिली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी १,०१२.२४ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा : औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित

सेन्सेक्स ८१,२८९.९६ -२३६.१८ (-०.२९%)

निफ्टी २४,५४८.७० – ९३.१० (-०.३८%)

डॉलर ८४.८७ ४ पैसे

तेल ७३.७४ ०.३०

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market updates bse sensex declined by 236 points print eco news css