Aadhaar Card Process Eligibility Status Linking : शाळेत प्रवेश घेताना, नोकरीवर रुजू होताना, बँकेच्या प्रत्येक कामासाठी, मोबाइलसाठीचे सिमकार्ड, किंवा अगदी ट्रेन बुकिंग करण्यासाठी सुद्धा आधार कार्ड मागितले जाते. त्यामुळे आधार कार्ड आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. तर आज आपण या लेखातून आधार कार्ड संबंधित तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत…

तर आधार कार्ड म्हणजे काय (What Is Aadhaar Card)

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे प्रदान केलेला १२ अंकी क्रमांक म्हणजे आधार कार्ड होय. आयरिस स्कॅन, फिंगरप्रिंट्स आणि फोटो यासारखी विविध माहिती आधार कार्डवर असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची (UIDAI) स्थापना करण्यात आली. त्यानंतर आधार कार्डची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली. त्यामुळे सर्व आधारकार्ड UIDAI द्वारे जारी केले जातात. सरकारकडून मिळणाऱ्या विविध लाभ योजना, सवलती, व शासकीय सेवा योग्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो.

आधार कार्ड बद्दलच्या महत्वाच्या बाबी (Important Information About Aadhaar Card)

जानेवारी २००९ मध्ये, भारत सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केली. या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सप्टेंबर २०१० पासून आधार कार्ड बनविण्याचे काम सुरू झाले. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा आणि अमित अग्रवाल सीईओ आहेत. आधार संदर्भात तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही आधार ग्राहक सेवा क्रमांक १९४७ या क्रमांकावर संपर्क करू शकता. तसेच आधार कार्डची वैधता आजीवन आहे. आधार नोंदणी केंद्रांची संख्या ३०,००० पेक्षा जास्त आहे आणि कार्ड नोंदणींची संख्या १३८ कोटी (अंदाजे) वर्तवण्यात आली आहे.

आधार कार्ड काढण्याचे फायदे काय? (Benefits of Aadhaar Card)

थेट बँक खात्यात एलपीजी सबसिडी – पहल योजनेअंतर्गत तुमच्या सबसिडीचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी आधार कार्ड तुमच्या एलपीजी ग्राहक क्रमांकाशी जोडला जातो.

जन धन योजना – आधार हा प्राथमिक दस्तऐवज (डॉक्युमेंट) म्हणून ठेवून तुमचे प्रधानमंत्री जन धन योजनेचे (पीएमजेडीवाय) खाते उघडा; ज्यामध्ये रुपे कार्ड, शून्य शिल्लक बचत आणि विमा असे फायदे मिळतात.

१० दिवसांत पासपोर्ट – तुमची पोलिस पडताळणी पूर्ण करण्यापूर्वी आधार कार्डमुळे फक्त १० दिवसांत तुम्हाला पासपोर्ट मिळू शकतो.

डिजिटल लॉकर – तुमचा आधार डिजीलॉकर सिस्टमशी लिंक करून सरकारी सर्व्हरवर वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षितपणे साठवून ठेवता येतात.

मतदार कार्ड आधार लिंक – मतदार ओळखपत्रांशी आधार लिंक केल्याने बोगस मतदारांना दूर करण्यास मदत होते आणि प्रति व्यक्ती एक मतदार ओळखपत्र सुनिश्चित होते.

मासिक पेन्शन – मासिक पेन्शन मिळविण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी पेन्शनधारकांनी त्यांचे आधार लिंक केले पाहिजेत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) – संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) लाभ मिळविण्यासाठी आधार आता अनिवार्य करण्यात आले आहे.

बँक खाते उघडणे – बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्डचा वैध पुरावा म्हणून वापर केला जातो.

डिजिटल लाईफ सर्टिफिकेट – पेन्शनधारक आता प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय जीवन प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी आधार-लिंक्ड डिजिटल सर्टिफिकेट वापरू शकतात.

सेबी – शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आणि पत्त्याचा वैध पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारला जातो.

मोबाइल नंबर लिंक – सर्व मोबाइल ग्राहकांनी आधार त्यांच्या नंबरशी लिंक केला पाहिजे, नवीन कनेक्शनसाठी आधार पडताळणी आवश्यक आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स लिंक – परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सशी आधार लिंक करण्याची योजना आहे.

गुंतवणूक – म्युच्युअल फंड आणि इतर आर्थिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.

बँक खाती – खातेधारकांनी खाते उघडल्यापासून ६ महिन्यांच्या आत त्यांचे आधार कार्ड अकाउंटशी लिंक करून घेतले पाहिजे.

आयआरसीटीसी तिकीट बुकिंग – तुमचा आधार कार्डची पडताळणी करून आयआरसीटीसीवर महिन्याला तुम्ही १२ तिकिटे बूक करू शकता.

आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) – आरोग्य नोंदी व्यवस्थापित करण्यासाठी आधार कार्ड वापरून एक १४ अंकी आभा (ABHA) क्रमांक तयार करू शकता.

हेही वाचा

आधार कार्डचे फीचर्स काय आहेत? (Features Of Aadhaar Card)

आधार हा भारत सरकारने सर्व भारतीय रहिवाशांना जारी केलेला एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे आणि या दस्तऐवजाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत…

एक आधार – आधार हा व्यक्तीच्या बायोमेट्रिक्सशी जोडलेला एक युनिक क्रमांक आहे, जो डुप्लिकेट आणि बनावट ओळख ओळखण्यास मदत करतो, आणि सरकारला पात्र व्यक्तींना लाभ देण्यास सक्षम बनवतो.

पोर्टेबिलिटी – आधार हा एक युनिवर्सल नंबर आहे, जो एजन्सी आणि सेवांना केंद्रीय यूआयडी डेटाबेसद्वारे देशात कुठेही लाभ घेणाऱ्याची ओळख प्रमाणित करण्यास अनुमती देतो.

इलेक्ट्रॉनिक बेनिफिट ट्रान्स्फर – आधार नंबरशी जोडलेल्या बँक खात्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या पैशांच्या व्यवहारासाठी एक सुरक्षित, कमी किमतीचा प्लॅटफॉर्म तयार होतो; ज्यामुळे खर्च कमी होतो, गैरव्यवहार टाळून गरजू व्यक्तींपर्यंत थेट पैसे पोहोचतात.

आधार-बेस प्रमाणीकरण – आधार धारकांची ओळख पटवण्यासाठी UIDAI ऑनलाइन प्रमाणीकरण सेवा उपल्बध करून दिली आहे , ज्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत फायदे पोहोचतील याची खात्री होते.

सुधारित सेवा आणि पारदर्शकता – आधार कार्डमुळे लाभार्थी आणि एजन्सींसाठी उपलब्धता, गुणवत्ता आणि पारदर्शकता दिली जाते.

सेल्फ सर्व्हिस कन्ट्रोल – आधार धारक आरबीआय स्टँडर्डचे पालन करून, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरून मोबाइल, किओस्क किंवा इतर माध्यमांद्वारे माहिती मिळवू शकतात, सेवांची मागणी करू शकतात आणि तक्रारी दाखल करू शकतात.

आधार कार्ड सरकारने जारी केलेले कागदपत्र असल्याने, ओळखीचा पुरावा तसेच बँक खाते उघडण्यासाठी, कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आणि सरकारी अनुदानासाठी पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.तुम्हाला १४ जून २०२५ पर्यंत कोणतेही शुल्क न आकारता आधार कार्डसाठी ओळखीचा पुरावा (PoI) आणि पत्त्याचा पुरावा (PoA) कागदपत्रे सादर करण्याचा पर्याय आहे.

आधार कार्डमध्ये कोणती माहिती असते? (What Information Does an Aadhaar Card Contain)

१. लोकसंख्याशास्त्रीय माहिती

तुमचे नाव, जन्मतारीख, वय, पत्ता, ईआयडी- एनरोलमेंट नंबर, बारकोड,

२. बायोमेट्रिक माहिती

फोटो, दोन्ही डोळ्यांचे आयरिस स्कॅन, बोटांचे ठसे (सगळ्या दहा बोटांचे )

आधार कार्ड नोंदणी केंद्राबद्दल माहिती (Information About Aadhaar Card Enrolment Centres)

अर्जदारांना आधार नोंदणी केंद्र तसेच कायमस्वरूपी नोंदणी केंद्रांची माहिती UIDAI वेबसाइटवर मिळू शकते, ज्यामध्ये राज्य आणि शहरानुसार सध्याच्या नोंदणी केंद्रांची यादी दिलेली असते. ही आधार नोंदणी केंद्रे कशी शोधायची याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात…

आधार कार्डवरील माहिती ऑनलाइन कशी अपडेट करायची ? (How To Update Aadhaar Card Online)

जर तुमच्या आधार कार्डच्या माहितीमध्ये किंवा आधार कार्ड संबंधित अर्ज सादर केल्यानंतरची माहिती बदलायची असेल तर तुम्ही UIDAI वेबसाइटला भेट देऊन ही माहिती ऑनलाइन अपडेट करू शकता. लोकसंख्याशास्त्रीय असो किंवा बायोमेट्रिक माहिती दोन्ही अपडेट करता येतात.

आधार कार्डमध्ये तुमचा मोबाइल नंबर कसा लिंक करायचा ? (How to Add Your Mobile Number to Aadhaar Card)

तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचा मोबाइल नंबर लिंक करणे महत्वाचे आहे. कारण आधार सेवा मिळविण्यासाठी आणि तुमच्या आधार कार्डमधील माहिती बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जातो. तसेच मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी, तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज द्यावा लागतो.

ई-आधार कार्ड (e-Aadhaar Card)

ई-आधार ही तुमच्या आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत आहे आणि ती ओरिजिनल आधार कार्डच्या ऐवजी वापरता येते, सगळीकडे स्वीकारली जाते आणि UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. ई-आधार पीडीएफ स्वरूपात सेव्ह केले जाते जातात आणि पासवर्डने सुरक्षितही ठेवले जातात. तुम्ही तुमच्या आधारची मास्क्ड कॉपी डाउनलोड करणे हा पर्याय देखील निवडू शकता, ज्यामुळे तुमचा आधार क्रमांक इतरांपासून लपवता येईल.

mAadhaar

आधार कार्ड आणि त्याच्याशी संबंधित सेवा अधिक सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी, UIDAI ने mAadhaar जारी केले आहे; जे अँड्रॉइड डिव्हाइससाठी एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे. या ॲपमध्ये युजर्सची आधार कार्डची माहिती डिजीटल स्वरूपात असते आणि प्रवासात असताना तुम्ही यामध्ये सहज प्रवेश करू शकता. युजर्स त्यांच्या ॲपवर ३ प्रोफाइल जोडू शकतात आणि त्यांचे बायोमेट्रिक्स लॉक करणे आणि आधारसाठी त्यांचे ई-केवायसी ॲक्सेस करणे यासारख्या विविध सेवा देऊ शकतात.

आधार कार्ड काढण्याचा उद्देश काय आहे ? (What is the purpose of issuing an Aadhaar card)

  • आधार हा एक युनिक १२ अंकी क्रमांक आहे ; जो प्रत्येक भारतीय रहिवाशासाठी ओळखीचा पुरावा म्हणून काम करतो.
  • आधार कार्ड सरकारी फायदे आणि अनुदानांचे वितरण सुलभ करण्यास मदत करते, फसवणूक कमी करून योग्य युजर्सना मदत मिळते याची खात्री करतो .
  • आधार कार्डमुळे बँक खाती उघडण्यास आणि आर्थिक सेवांमध्ये प्रवेश करण्यास सोपे जाते.
  • आधार पॅनशी जोडून कर भरणे सोपे जाते.
  • आधार कार्ड सेवा मोबाइल कनेक्शन आणि ऑनलाइन बँकिंगसाठी डिजिटल प्रमाणीकरण सक्षम करते. हे अचूक लोकसंख्याशास्त्रीय डेटा प्रदान करते.

आधार कार्डसाठी पात्रता काय लागते (What is the Eligibility Of Aadhaar Card )

  • अर्जदार हा देशात राहणारा भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदार हा परदेशात राहणारा भारतीय (NRI) आहे, पण सध्या भारतात राहतो
  • अर्जदार हा वैध परदेशी पासपोर्ट असलेला ओसीआय कार्डधारक आणि गेल्या १२ महिन्यांत भारतात किमान १८२ दिवस राहिलेला असावा.
  • अर्जदाराकडे परदेशी पासपोर्ट आहे आणि त्याला लॉँग टर्म व्हिजा दिला आहे.
  • अर्जदार हा नेपाळ किंवा भूतानचा नागरिक असावा.
  • गेल्या वर्षी भारतात किमान १८२ दिवस वास्तव्य केलेले इतर निवासी परदेशी आहेत.

अनिवासी भारतीय आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. पण, आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी अनिवासी भारतीयांकडे वैध भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे.

अल्पवयीन मुलांसाठी आधार कार्ड काढू शकतो का ? (Aadhaar Card for Minors)

अल्पवयीन किंवा १८ वर्षांखालील भारतातील नागरिक देखील आधारसाठी अर्ज करू शकतात. पण , मुलाच्या पालकांची ओळख आणि पत्त्याचा पुराव्याची माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. नवजात बालके देखील आधारसाठी अर्ज करू शकतात; पण, ही मुले पाच वर्षे आणि १५ वर्षांचे झाल्यावर त्यांना बायोमेट्रिक्स अपडेट करावे लागतील.

UIDAI आधार कार्डशी संबंधित कोणत्या सेवा प्रदान करतो? (What services does the UIDAI provide related to Aadhaar card)

आधार कार्डची पडताळणी करा – आधार क्रमांक वैध आणि सक्रिय आहे की नाही हे तपासून घ्या.

आधार क्रमांकाची पडताळणी करा – आधार नोंदणी किंवा अलीकडील अपडेट दरम्यान वापरलेला नोंदणीकृत मोबाइल किंवा ईमेल आयडीची पडताळणी करून घ्या.

ईमेल किंवा मोबाइल नंबर पडताळणी करा – तुमच्या आधारशी संबंधित नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी योग्य आहे का तपासा.

आधार कार्डचा नंबर मिळवा – नोंदणीकृत मोबाइल वापरून आधार क्रमांक मिळवा.

तुमच्याकडून हरवलेलं आधार कार्ड किंवा लक्षात न राहिलेला EID/UID मिळवा – हरवलेला किंवा विसरलेला आधार कार्डची माहिती परत मिळवा.

व्हीआयडी जनरेट करा – आधार प्रमाणीकरणासाठी तात्पुरता १६ अंकी व्हर्च्युअल आयडी तयार करून देतो.

आधार व्हर्च्युअल आयडी जनरेटर – सुरक्षित आधार पडताळणीसाठी व्हर्च्युअल आयडी तयार करा.

ऑफलाइन आधार पडताळणी – ऑफलाइन ओळख पडताळणीसाठी आधार पेपरलेस ई-केवायसी वापरा.

आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी (बीटा) – आधार वापरून ऑफलाइन पडताळणीसाठी एक सुरक्षित डॉक्युमेंट आहे.

आधार लिंक आहे का तपासणे – NPCI सर्व्हरवरून तुमच्या आधार आणि बँक खात्याच्या लिंक आहे स्थिती तपासा.

बँक सीडिंग स्टेटस – बँक खात्याच्या स्थितीसह आधार कार्ड लिंकची पडताळणी करा.

आधार कार्डची वैधता तपासा – आधार क्रमांक बरोबर आहे का तपासा.

तुमचे बायोमेट्रिक्स सुरक्षित करा – सुरक्षिततेसाठी बायोमेट्रिक डेटा लॉक करा.

बायोमेट्रिक्स लॉक / अनलॉक करा – आधारसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लॉक किंवा अनलॉक करा.

ऑथेंटिकेशन हिस्ट्री – आधारशी लिंक केलेले शेवटचे ५० ऑथेंटिकेशन व्यवहार चेक करा.

आधार लॉक किंवा अनलॉक – व्हर्च्युअल आयडी-आधारित ऑथेंटिकेशनला परवानगी देताना ऑथेंटिकेशन टाळण्यासाठी आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करतात.

आधार लॉक आणि अनलॉक सेवा – लॉक/अनलॉक सेवांद्वारे तुमच्या आधार क्रमांकाची सुरक्षा व्यवस्थापित करा.

एसएमएसवर आधार सेवा – तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून १९४७ वर विनंती पाठवून एसएमएसद्वारे आधार कार्डच्या सेवांमध्ये प्रवेश करू शकता.

आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Aadhaar Card)

आधार कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी तीन प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात. ज्यामध्ये पत्त्याचा पुरावा (POA), ओळखीचा पुरावा (POI) आणि जन्मतारीख (DOB) यांचा समावेश असतो.

१. ओळखीचा पुरावामध्ये पासपोर्ट, NREGA जॉब कार्ड, किसान फोटो पासबुक, पेन्शनधारकांचे फोटो असलेले ओळखपत्र, रेशन कार्ड, ईसीएचएस/सीजीएचएस फोटो असलेले कार्ड, मतदार ओळखपत्र, सरकारने दिलेले फोटो असलेले ओळखपत्र, पोस्ट विभागाने दिलेले नाव आणि फोटो, पत्ता असणारे कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारने दिलेले कोणत्याही सेवेचं ओळखपत्र, अपंगत्व ओळखपत्र, सरकारने दिलेले एससी, एसटी किंवा ओबीसी प्रमाणपत्र, लिंग ओळखपत्र, नेपाळ/भूतानच्या नागरिकांसाठी नेपाळ/भूतानचा वैध पासपोर्ट, परदेशी नागरिक असाल तर वैध व्हिसा, वैध परदेशी पासपोर्टसह मागील १२ महिन्यांत १८२ दिवस किंवा त्याहून अधिक काळ भारतात वास्तव्य केलेले नागरिकत्वाचा पुरावा आदी अनेक गोष्टी तुम्ही दाखवू शकता.

२. पत्त्याचा पुरावामध्ये बँक स्टेटमेंट, लेटरहेडवर बँकेचा फोटो असलेले स्वाक्षरी केलेले पत्र, सरकारी फोटो असलेले ओळखपत्र किंवा सार्वजनिक उपक्रमांनी जारी केलेले फोटो असणारे सेवा ओळखपत्र, टपाल विभागाने जारी केलेला, फोटो आणि पत्ता, लेटरहेडवर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने जारी केलेले फोटो आणि स्वाक्षरी केलेले पत्र, मालमत्ता कर पावती (एक वर्षापेक्षा जुनी नसावी), गॅस कनेक्शन बिल किंवा इतर कोणतेही उपयुक्तता बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे), पासबुक, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, अपंगत्व कार्ड, सरकारने जारी केलेले निवासस्थान वाटप पत्र, जीवन किंवा वैद्यकीय विमा पॉलिसी, कारागृह कार्यालयाने स्वाक्षरी आणि शिक्कासह जारी केलेले कैदी प्रवृत्ती दस्तऐवज (PID), वैध दीर्घकालीन व्हिसा (LTV) दस्तऐवज, परदेशी पासपोर्टसह, विदेशी नागरिकाला FRRO/FRO ने जारी केलेले वैध नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवासी परवाना आवश्यक आहे.

३. वयाचा पुरावा दाखवण्यासाठी पासपोर्ट, पॅन कार्ड, सरकारी विद्यापीठ किंवा मंडळाने दिलेले गुणपत्रक, ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ अंतर्गत दिलेले तिसरे लिंग प्रमाणपत्र, एसएससी प्रमाणपत्र, राज्य/केंद्रीय पेन्शन पेमेंट ऑर्डर, जन्म प्रमाणपत्र, जन्म तारखेचे प्रमाणपत्र आणि गट राजपत्रित अधिकाऱ्याने लेटरहेडवर जारी केलेले प्रमाणपत्र बरोबर घेऊन जा.

४. नातेसंबंधाचा पुरावा – पीडीएस कार्ड, केंद्र/राज्य सरकारद्वारे जारी केलेले कुटुंब हक्काचे दस्तऐवज, मनरेगाचे जॉब कार्ड, जन्म नोंदणीकर्ता किंवा महानगरपालिका किंवा स्थानिक सरकारद्वारे जारी केलेले जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी केलेले अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा संस्थेद्वारे जारी केलेले गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, लिंग ओळखपत्र, जन्म आणि मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ अंतर्गत अधिकृत प्राधिकरणाद्वारे जारी केलेले जन्म प्रमाणपत्र, केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले कुटुंब हक्काचे दस्तऐवज, कायदेशीर पालकत्वाचे दस्तऐवज आदी कागपत्र लागतील.

आधार कार्डसाठी नोंदणी कशी करावी (How to Enroll for Aadhaar Card)

आधार अर्ज प्रक्रिया कोणत्याही अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरून करता येते. तुम्हाला UIDAI वेबसाइटवर आधार नोंदणी केंद्रांची यादी मिळेल. नावनोंदणी प्रक्रिया आणखीन सोपी करण्यासाठी UIDAI ने १० हजार हून अधिक पोस्ट ऑफिस आणि बँक शाखांना कायमस्वरूपी नोंदणी केंद्र म्हणून काम करण्यास अधिकृत केले आहे.

  • आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी आधारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • फॉर्म भरण्यासाठी आवश्यक माहिती लिहा.
  • आवश्यक कागदपत्रे सादर करा.
  • अर्जदाराने त्यांचे बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि आयरीस स्कॅन) प्रदान करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने नोंदणी पावती स्लिप प्राप्त करणे आवश्यक आहे
  • अर्जदाराला त्यांचे आधार कार्ड नोंदणीकृत पत्त्यावर मिळेल.
  • आधार नोंदणी ही एक स्वयंसेवी सेवा आहे जी मोफत दिली जाते.

बाल-आधारसाठी अर्ज कसा करावा (How to Enroll for Baal-Aadhaar)

  • जवळच्या नावनोंदणी केंद्राचा शोध घेण्यासाठी UIDAI वेबसाइटला भेट द्या
  • मुलाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत घेऊन नावनोंदणी केंद्राला भेट द्या.
  • व्हेरिफिकेशनसाठी मुलाच्या पालकांपैकी एकाचा आधार क्रमांक अनिवार्यपणे प्रदान करणे आवश्यक आहे आणि बाल आधार कार्ड पालकांच्या आधार कार्डशी जोडला जाईल.
  • बाल आधार अर्ज फॉर्मवर सर्व संबंधित माहिती आणि मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे.
  • मुलाचा किंवा अल्पवयीन मुलाचा फोटो घेतला जाईल आणि जर मूल पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तर बायोमेट्रिक रेकॉर्ड केले जाणार नाही.
  • वरील पायऱ्या पूर्ण केल्यानंतर, पावती घ्या.
  • अर्ज फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे मोबाइल नंबरवर पडताळणी एसएमएस पाठवल्यानंतर बाल आधार तुमच्या पत्त्यावर पाठवला जाईल.

आधार कार्ड कसे अपडेट करायचे आणि आधार कार्ड नोंदणी केंद्राद्वारे आणि ऑनलाइन पद्धतीने कोणती माहिती उपडेट करता येते? (How to Update Aadhaar Card)

१. नाव, वय, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पत्ता, फोटो.

२. बायोमेट्रिक आधार डेटा म्हणजे आयरिस, फिंगरप्रिंट बदलणे.

अर्जदार ऑनलाइन पद्धतीने पत्ता अपडेट करू शकतात, तर बायोमेट्रिक डेटासह इतर लोकसंख्याशास्त्रीय डेटा फक्त नोंदणी केंद्राला भेट देऊन अपडेट करता येतो.

कोणत्याही कागदपत्रांशिवाय आधार कार्डसाठी अर्ज कसा करायचा (How to Apply for Aadhaar Card without any Documents)

UIDAI च्या आधार नोंदणी फॉर्मनुसार, जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर आधार कार्डसाठी तुम्ही पुढील दोन वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करू शकता.

कुटुंब प्रमुख (HoF) आधारित अर्ज – या नावनोंदणी प्रक्रियेअंतर्गत, कुटुंब प्रमुख (वैध आधार असलेला) अर्जदाराशी त्याचे / तिचे नाते सिद्ध करणारे कागदपत्रे सादर करू शकतो. या माहितीची यशस्वी पडताळणी केल्यानंतर अर्जदाराची नोंदणी प्रक्रिया केली जाईल.

इंट्रोड्यूसर बेस ॲप्लिकेशन – अर्जदाराकडे ओळखीचा किंवा पत्त्याचा वैध पुरावा नसलेल्यांनी, रजिस्ट्रार किंवा आधार क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ओळखल्या गेलेल्या आणि अधिसूचित केलेल्या परिचयकर्त्याद्वारे फॉर्म भरा .

आधार कार्ड ऑनलाईन कसे तपासायचे ? (How To Check Aadhaar Card Online)

  • अधिकृत UIDAI वेबसाइटला भेट द्या
  • क्रेडेन्शियल्स वापरून पोर्टलवर लॉग इन करा
  • ‘My Aadhaa’ सेक्शन अंतर्गत ‘Check Aadhaar Status’ वर क्लिक करा
  • नोंदणी क्रमांक आणि नोंदणीची वेळ प्रविष्ट करा
  • कॅप्चा पडताळणी कोड प्रविष्ट केल्यानंतर ‘Check Status’ वर क्लिक करा.

आधार कार्ड डाउनलोड किंवा प्रिंट कसे करावे? (How To Print And Download Aadhar Card)

  • UIDAI ने ई-आधार म्हणून ओळखले जाणारे हे कार्ड PDF स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे UIDAI वेबसाइटवरून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता…
  • ई-आधार खालीलपैकी एक आधार कार्ड क्रमांक वापरून अधिकृत UIDAI वेबसाइटद्वारे ॲक्सेस करता येते.
  • व्हर्च्युअल आयडी (VID) आणि नावनोंदणी आयडी (EID) सह.

आधार कार्ड चेक कसं करावं ? (How To Check Aadhar Card)

  • अधिकृत UIDAI वेबसाइटला भेट द्या.
  • ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये जा.
  • ‘Aadhaar Services’ सेक्शनमध्ये ‘आधार क्रमांकाची पडताळणी करा’ वर क्लिक करा.
  • आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
  • ‘Proceed and Verify Aadhaa’ वर क्लिक करा.
  • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील पानावरील स्टेप्स फॉलो करा.

आधार कार्ड पॅनशी कसा लिंक करावा ? (How To Link Aadhar Card With Pan)

भारत सरकारने आयकर रिटर्न भरताना व्यक्तींना त्यांचा पॅन आधार कार्डशी जोडण्यास सांगितले आहे. हा आदेश प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३३ एए (२) नुसार आहे. तर पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी दोन पद्धती आहेत: ई-फाइलिंग वेबसाइटद्वारे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे आणि दुसरं एसएमएसद्वारे आधार क्रमांक आणि पॅन लिंक करणे.

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे ? (How To Link Aadhar Card To Bank Account)

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०१७ मध्ये सर्व बँक खात्यांना आधारशी जोडण्याचे निर्देश दिले होते. तरीही, सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ च्या निर्णयानंतर, आता तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी जोडणे बंधनकारक नाही. पण, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने ते करू शकता:

इंटरनेट बँकिंग, बँकेच्या मोबाइल ॲप्लिकेशन, जवळच्या बँक शाखा, एटीएम, एसएमएस सेवा आणि तुमच्या मोबाइल नंबरचा सुद्धा वापरू करून आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक करू शकता.

आधार कार्डवरील तुमची बायोमेट्रिक माहिती कशी सुरक्षित करावी? (How to Secure or Release your Biometric Information in Aadhaar Card)

आधार भारतीय नागरिकांसाठी ओळख आणि पत्त्याचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून काम करतो, जो सरकारी सेवांमध्ये प्रवेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या आधारची सुरक्षा वाढविण्यासाठी, UIDAI तुमचा बायोमेट्रिक डेटा ऑनलाइन लॉक किंवा अनलॉक करण्याचा पर्याय देते. तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक आणि अनलॉक करण्याच्या पद्धत पुढीलप्रमाणे…

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे आधार बायोमेट्रिक डेटा सुरक्षित करा.
  • mAdhaar मोबाइल ॲप्लिकेशन वापरून आधार बायोमेट्रिक डेटा सुरक्षित करा.

आधार व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? (What Is Aadhaar Virtual ID)

आधार व्हर्च्युअल आयडी हा एक तात्पुरता कोड आहे ज्यामध्ये १६-अंकी क्रमांक असतो जो आधार क्रमांकाविरुद्ध जनरेट केलेल्या आधार क्रमांकाचा पर्याय असतो. अर्जदार आधार क्रमांकाविरुद्ध जनरेट केलेल्या फक्त एकच व्हर्च्युअल आयडी जनरेट करू शकतात जो अर्जदारांना पाहिजे तितक्या वेळा जनरेट करता येतो.पण, लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत मूळ आधार कार्ड परत मिळविण्यासाठी व्हर्च्युअल आयडीचा वापर करता येत नाही.

आधार प्रमाणीकरण म्हणजे काय? (What Is Aadhaar Authentication)

प्रमाणीकरण म्हणजे थोडक्यात आपले आधार अपडेट करणे हा त्याचा अर्थ आहे. कार्डधारकांना सेवा प्रदात्याकडून सेवा आणि फायदे मिळविण्यासाठी, व्यक्तीचे आधार तपशील पडताळणीसाठी UIDAI कडे सादर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आधार प्रमाणीकरण म्हणून ओळखली जाते. या प्रक्रियेमध्ये व्यक्तीच्या आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, लिंग, फिंगरप्रिंट्स किंवा आयरिस स्कॅन यांची पडताळणी केली जाते; जे UIDAI च्या सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी (CIDR) मध्ये सादर केले जातात. त्यानंतर UIDAI त्याच्या डेटाबेसमध्ये माहितीची अचूक पडताळली जाते.

ई-केव्हायसीसाठी साठी आधार कार्डला प्राधान्य का दिले जाते? (Why is Aadhaar card preferred for e-KYC)

  • आधार धारक UIDAI च्या माहितीशिवाय थेट KYC डेटा शेअर करू शकतात.
  • आधार क्रमांकाऐवजी, फक्त एक संदर्भ आयडी शेअर केला जातो.
  • पडताळणीसाठी कोर बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट्स किंवा आयरिस) आवश्यक नाहीत.
  • आधार धारक कोणता डेटा किंवा फोटो शेअर करायचा हे निवडू शकतात.
  • आधार धारकाने डाउनलोड केलेला केवायसी डेटा UIDAI द्वारे शोधण्यासाठी डिजिटली स्वाक्षरी केलेला असतो.
  • एजन्सी OTP (वन टाइम पासवर्ड) किंवा फेस ऑथेंटिकेशन वापरून डेटा सत्यापित करू शकतात.
  • केवायसी डेटा आधार धारकाने सेट केलेल्या वाक्यांशासह एन्क्रिप्ट केला जातो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या डेटावर नियंत्रण मिळते.
  • आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी आहे आणि आधार धारकाच्या संमतीने चालते.
  • आधारचा व्यापक वापर सक्षम करण्यासाठी, कोणतीही एजन्सी आधार धारकाच्या संमतीने त्याचा वापर करू शकते.

आधार अपडेट करताना काय लक्षात ठेवाल? (Things to Remember when Updating the Aadhaar Card)

ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना…

  • फॉर्म मोठ्या अक्षरात भरा
  • नावापूर्वी श्री, श्रीमती किंवा मिस असे लिहू नका
  • फॉर्म व्यक्तीच्या मूळ भाषेत किंवा इंग्रजीमध्ये भरा
  • सध्याचा मोबाईल नंबर द्या
  • आधार कुठे पाठवायचा तो योग्य पत्ता द्या
  • अर्जाबरोबर, व्यक्तींनी त्यांचे आवश्यक कागदपत्रे देखील जोडावीत
  • जर कोणतेही कालबाह्य झालेले कागदपत्रे सादर केली तर अर्ज नाकारला जाईल
  • अचूक माहिती दिली आहे का याची खात्री करावी

आधार कार्ड ग्राहक सेवा (Aadhaar Card Customer Care)

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) २४X७ इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR ) सेवा सुरू केल्या आहेत; जिथे व्यक्ती आधारशी संबंधित कोणत्याही सेवांसाठी
१. टोल-फ्री क्रमांक १९४७ वर कॉल करू शकतात.
२. help@uidai.gov.in वर ईमेल करू शकता.

आयव्हीआर सेवा सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते रात्री ११ आणि रविवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत उपलब्ध आहे.
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर या तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी ही सेवा उपलब्ध नाही.

आधार पीव्हीसी म्हणजे काय? (What Is Aadhar PV)

यूआयडीएआयने आधारचा नवीन प्रकार, म्हणजेच आधार पीव्हीसी कार्ड सादर केला. पॉलिव्हिनायल क्लोराईड (पीव्हीसी) कार्ड हा एक प्रकारचा टिकाऊ प्लास्टिक मटेरियल आहे. या कार्डवर तुमचा फोटो, नाव, पत्ता, आधार नंबर आणि एक सुरक्षित क्यूआर कोड छापलेला असतो. हे दिसायला आणि टिकायला अगदी तुमच्या एटीएम कार्डसारखं असतं, त्यामुळे ते सहजपणे पाकिटात ठेवता येतं आणि लवकर खराब होत नाही.

आधार कार्ड कोणत्या कागदपत्रांशी लिंक करावा (What should be linked with an Aadhaar card)

आधार विमा पॉलिसी, पॅन, युएएन, पीएफशी, आधार मतदार ओळखपत्र, एलपीजी कनेक्शन, रेशन कार्डशी लिंक करा. कारण – विविध सेवा आणि फायदे मिळविण्यासाठी तुमचे इतर कागदपत्रे आधारशी लिंक करणे महत्त्वाचे झाले आहे.