*   भारतीय नौसेनेत अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी १०+२ (बी.टेक्.) कॅडेट एन्ट्री स्कीम (पर्मनंट कमिशन) ४ वर्षे कालावधीचा कोर्स जुलै, २०१८ पासून इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी केरळ येथे भरती.

पात्रता – १२वी (विज्ञान) (फिजिक्स/ केमिस्ट्री/मॅथ्स विषयांसह सरासरी ७०% गुण आणि दहावी किंवा १२वीला इंग्रजी विषयात किमान ५०%  गुण)  जेईई (मेन), २०१७ परीक्षा उत्तीर्ण. (एसएसबी मुलाखतीसाठी जेईई (मेन), २०१७ मधील अखिल भारतीय रँकनुसार बोलाविले जाईल.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी, १९९९ ते १ जुलै, २००१ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड – उंची – १५७ सें.मी.

निवड पद्धती – एसएसबीतील गुणवत्तेनुसार निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीनंतर एक्झिक्युटिव्ह / इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी ४ वर्षे कालावधीच्या अ‍ॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या बी.टेक्. कोर्ससाठी ट्रेिनग दिले जाईल.

ट्रेिनगचा सर्व खर्च भारतीय नौदल करणार आहे. कॅडेट्सना कपडे आणि जेवण मोफत दिले जाईल. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर उमेदवारांना जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठामार्फत बी.टेक्. डिग्री दिली जाईल आणि सब-लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल.

वेतन – दरमहा रु. ८३,४४८/- ते रु. ९६,२०४/- (सीटीसी).

ऑनलाइन अर्ज http://www.joinindiannavy.gov.in  या संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

*   नेहरू विज्ञान केंद्र, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई – ४०० ०१८ येथे टेक्निशियन-ए च्या ३ पदांची भरती (कार्पेटरी, फिटर आणि इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये प्रत्येकी एक जागा अनारक्षित).

वेतन – दरमहा रु. २७,७१३/-

वयोमर्यादा – दि. ३० नोव्हेंबर, २०१७ रोजी १८-३५ वर्षे.

पात्रता – आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर एक वर्षांचा संबंधित अनुभव असावा.

अर्जाचा विहित नमुना http://www.nehrusciencecentre.gov.in  या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील. सर्व प्रमाणपत्रे आणि प्रशस्तीपत्रकांच्या प्रमाणित प्रतींसोबत विहित नमुन्यातील अर्ज वरील पत्त्यावर दि. ३० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘जाहिरात क्र. ४७/२०१७ साठी टेक्निशियन-ए पदाकरिता अर्ज’ असे नमूद करावे.

*   आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अतिरिक्त संचालक यांचे कार्यालय, केंद्र सरकार आरोग्य योजना, मुंबई/ पुणे/नागपूर/अहमदाबाद येथे एकत्रित रिक्त पदांची भरती.

१) फार्मासिस्ट – ३९ पदे (मुंबई – १२, पुणे – १०, नागपूर – १०, अहमदाबाद – ७)

पात्रता – १२ वी (पीसीबी) उत्तीर्ण. फार्मसीमधील पदविका. २ वर्षांचा अनुभव किंवा बी.फार्म. उत्तीर्ण.

२) फार्मासिस्ट कम क्लर्क (होमिओपॅथी) – ६ पदे.

पात्रता – १२वी उत्तीर्ण  डिप्लोमा/ प्रमाणपत्र होमिओपॅथीमधील फार्मसी.

३) फार्मासिस्ट (आयुर्वेद) – ७ पदे.

पात्रता – २ वर्षे कालावधीची आयुर्वेदमधील पदविका. २ वर्षांचा अनुभव.

४) नìसग ऑफिसर – ग्रेड-१ – १३ पदे (मुंबई – ८, पुणे – ४, अहमदाबाद – १)

पात्रता – १२वी उत्तीर्ण. जीएन अँड एम डिप्लोमा.

५) लॅबोरेटरी टेक्निशियन – ९ पदे (मुंबई – ५, पुणे – २, अहमदाबाद – २)

पात्रता – १२वी उत्तीर्ण. लॅबोरेटरी टेक्निशियन डिप्लोमा. २ वर्षांचा अनुभव.

६) लॅबोरेटरी असिस्टंट – ५ पदे.

पात्रता – २ वर्षांचा एएनएम कोर्स उत्तीर्ण. नìसग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक.

७) डेंटल टेक्निशियन – १ पद (मुंबई – खुला).

पात्रता – १२वी उत्तीर्ण.  डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन अँड डेंटल हायजिन. २ वर्षांचा अनुभव.

८) लेडी हेल्थ व्हिजिटर – १३ पदे (मुंबई).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण. लेडी हेल्थ व्हिजिटर डिप्लोमा.

९) ईसीजी टेक्निशियन – २ पदे

(प्रत्येकी १, मुंबई/नागपूरसाठी खुला गट).

वयोमर्यादा – पद क्र. १, २, ६ आणि ९ साठी १८ ते २५ वर्षे. पद क्र. ५, ७ आणि ८ साठी १८ ते ३० वर्षे. पद क्र. ३ साठी २० ते ३० वर्षे. पद क्र. ४ साठी (नìसग ऑफिसर) – २१ ते ३५ वर्षे.

अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती  सीजीएचएस रिक्रूटमेंट पोर्टल  <https://cghsrecruitment.mahaonline.gov.in/&gt; वर उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर, २०१७ आहे.