नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, पुणे येथे खालीलप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २०१८ च्या सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
* पुणे, हैदराबाद, गोवा व दिल्ली येथे उपलब्ध असणारा अॅडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम
* पुणे व हैदराबाद येथे उपलब्ध असणारा प्रोजेक्ट इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* पुणे येथील रियल इस्टेट अॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवर मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* पुणे येथील इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, डेव्हल्पमेंट अॅण्ड मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* पुणे येथील फॅमिली ओन्ड कन्स्ट्रक्शन बिझनेस विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* पुणे व दिल्ली येथे उपलब्ध असणारा काँटेम्पररी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अॅण्ड मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* हैदराबाद येथील क्वांटिटी सव्र्हेइंग अॅण्ड काँटॅक्ट मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* हैदराबाद येथील हेल्थ, सेफ्टी अॅण्ड एन्व्हायरॉन्मेंट मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यसाक्रम.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड चाचणी ‘निकमार’तर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना ‘निकमार’च्या संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क
अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून अर्जदारांनी एका अभ्यासक्रमासाठी १९०० रु. व एकाहून अधिक अभ्यासक्रमासाठी २५०० रु. ‘निकमार’ पुणे यांच्या नावाने असणाऱ्या व पुणे येथे देय असणाऱ्या डिमांड ड्राफ्टद्वारा पाठविणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील
प्रवेश अर्जाचा नमुना व अभ्यासक्रमांच्या संदर्भातील तपशिलासाठी निकमार पुणेच्या दूरध्वनी क्र. ०२०-६६८५९१६६ वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या http://admission.nicmar.ac.in/onlineadmission/ किंवा http://www.nicmar.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विशेष सूचना
वरील अभ्यासक्रमांसाठी निवड झालेल्या निवडक व हुशार विद्यार्थ्यांना निकमारतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येतील.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज संस्थेच्या कार्यालयात २७ डिसेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.