महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या डीएचएस- सीपीएस पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१७ या शैक्षणिक सत्रात सेवारत व इतर उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध जागांची संख्या व तपशील- एकूण उपलब्ध जागांपैकी ४०% जागा सेवारत उमेदवारांसाठी असून ६०% जागा या इतर विद्यार्थी उमेदवारांना उपलब्ध असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-

सेवारत उमेदवार : एकूण उपलब्ध जागा ८६. यापैकी ४३ जागा अनुसूचित जातीच्या, ६ जागा अनुसूचित जमातीच्या, ३ जागा विमुक्त जमातीच्या, ७ जागा भटक्या जमातीच्या तर १६ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी असून ४३ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

खुल्या वर्गगटातील उमेदवार- एकूण उपलब्ध जागा १३०. यापैकी १७ जागा अनुसूचित जातीच्या, ९ जागा अनुसूचित जमातीच्या, ४ जागा विमुक्त जमातीच्या, १० जागा भटक्या जमातीच्या तर २५ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असून ६५ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

आवश्यक पात्रता- अर्जदार वैद्यकशास्त्र क्षेत्रातील पात्रताधारक असावेत व त्यांनी ‘एनईईटी- पीजी- २०१७’ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

अर्जासह भरावयाचे शुल्क- प्रवेश अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून राखीव वर्गगटातील अर्जदारांनी १५०० रुपयांचा (खुल्या वर्गगटातील उमेदवारांनी २००० रुपयांचा), ‘डायरेक्टर ऑफ हेल्थ सव्‍‌र्हिसेस- मुंबई’ यांच्या नावे असलेला व मुंबई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट प्रवेश अर्जासह पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयाची जाहिरात पाहावी अथवा संचालनालयाच्या www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज सीपीएस- सेल महाराष्ट्र आरोग्य संचालनालय, ८ वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर ९ जून २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.