नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (CSIR-NCL) पुणे इथे वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांना http://jobs.ncl.res.in/ या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सीएसआयआर-एनसीएल पुणे भरती मंडळ, पुणे यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये एकूण ११ रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पदांनुसार २८ सप्टेंबर, ७ आणि १० ऑक्टोबर २०२१आहे. अर्ज करण्यास २५ सप्टेंबर २०२१ पासून सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट या पदांसाठी भरती होणार आहे.

एकूण पदे किती?

एकूण ११ रिक्त जागा आहेत.

अधिकृत वेबसाईट कोणती?

http://www.ncl-india.org/

नोकरीचे ठिकाण कोणते?

पुणे हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पदांनुसार २८ सप्टेंबर, ७ आणि १० ऑक्टोबर २०२१आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

डॉक्टरेट पदवी / पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

चाचणी आणि/किंवा मुलाखत

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csir pune recruitment 2021 sarkari nokriya apply online pune job ttg