उमेदवारांनी एमबीए, एमएसडब्ल्यू अथवा पर्सोनेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्समधील पदविका पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा ‘एनबीसीसी’च्या http://www.nbccindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ७ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीमा शुल्क आयुक्त कार्यालय- जामनगर येथे नाविकांच्या ३७ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत तसेच ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांना जलवाहतूक क्षेत्रातील कामांचा तीन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा शुल्क विभाग, जामनगरची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह  ‘दि अ‍ॅडिशनल कमिशनर- कस्टम्स (प्रीव्हेन्शन) कमिशनरेट, शारदा हाऊस, बेदी बंदर रोड, जामनगर- ३६१००८, गुजरात या पत्त्यावर ७ जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.

सैन्यदलाच्या शिक्षण विभागात १० जागा
उमेदवारांनी इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, लोकप्रशासन, सांख्यिकी यांसारख्या विषयात एमए पात्रता द्वितीय अथवा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या शैक्षणिक विभागाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत साहाय्यक आयुक्तपदाच्या १७० जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. कामगार कायदे- कंपनीविषयक कायदे या विषयातील पदविका ही अतिरिक्त पात्रता समजण्यात येईल. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconlinenic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.

सैन्यदलात अभियंत्यांसाठी १६० जागा
उमेदवारांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग यांसारख्या विषयांतील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १२ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.

आयुध निर्माणी- चांदा, चंद्रपूर येथे वाहनचालकांच्या ६ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व अवजड आणि हलक्या वाहनांचे वैध परवानाधारक असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- चांदाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले अर्ज सीनिअर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी- चांदा, चंद्रपूर-  ४४२५०१ या पत्त्यावर १० जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.

नीरी, नागपूर येथे ज्युनिअर स्टेनोग्राफरच्या ४ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत तसेच लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट, इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रता त्यांनी प्राप्त केलेली असावी.  वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जून २०१५ च्या अंकातील ‘नीरी’ची जाहिरात पाहावी अथवा ‘नीरी’च्या http://www.neeri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यानुसार भरलेले अर्ज डायरेक्टर, सीएसआयआर- नीरी, नेहरू मार्ग, नागपूर- ४४००२० या पत्त्यावर १० जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.

आयुध निर्माणी- कानपूर येथे कनिष्ठ कारकुनांच्या १४ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी, कानपूरची जाहिरात पाहावी अथवा http://www.oefkanpur.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.

इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, हैद्राबाद येथे साहाय्यकांच्या २४ जागा
अधिक माहितीसाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या http://www.irda.gov.in ‘Employment’ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, तिसरा मजला, परिश्रम भवन, बशीरबाग, हैद्राबाद- ४ या पत्त्यावर १० जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.

आयुध डेपो, अलिपूर येथे सुपरिंटेंडंट- स्टोअर्सच्या ४ जागा
उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. ते अभियांत्रिकीचे पदविकाधारक आणि मटेरियल मॅनेजमेंटमधील पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध डेपो, अलिपूरची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह कमांडंट, ऑर्डनन्स डेपो, अलिपूर, कोलकाता ७०००२७ या पत्त्यावर ११ जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.

सीमा सुरक्षा दलात शिपाई- ट्रेड्समनच्या ७९७ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २३ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा बलाची जाहिरात पाहावी अथवा बीएसएफच्या http://www.bsf.nic.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह सीमा सुरक्षा दलाच्या संबंधित कार्यालयात १२ जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunity