ESIC Recruitment 2022: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने सामाजिक सुरक्षा अधिकारी, व्यवस्थापक ग्रेड-II किंवा अधीक्षक या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र ESIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात – esic.nic.in. उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, संगणक कौशल्य चाचणी आणि वर्णनात्मक परीक्षेच्या आधारे केली जाईल. या पदावर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन आणि लागू भत्त्यांचा लाभ दिला जाईल. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते १२ एप्रिल २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदांचा तपशील

या भरती मोहिमेद्वारे एकूण ९३ रिक्त पदे भरली जातील. यामध्ये ४३ रिक्त पदे अनारक्षित श्रेणीतील पदासाठी, ९ जागा एससी श्रेणीच्या पदासाठी, ८ जागा एसटी श्रेणीच्या पदासाठी, २४ जागा ओबीएस श्रेणीसाठी आणि ९ रिक्त पदे EWS श्रेणीसाठी आहेत.

(हे ही वाचा: ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! पगार ७० हजारापर्यंत; जाणून घ्या अधिक तपशील)

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय?

मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, कायदा किंवा व्यवस्थापन या विषयात बॅचलर पदवी. याशिवाय ऑफिस सुट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे चांगले ज्ञान असावे. १२ एप्रिल रोजी शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल २७ वर्षे असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.

(हे ही वाचा: SSC MTS 2022: कर्मचारी निवड आयोगाने जारी केली भरतीची अधिसूचना; ‘असा’ करा अर्ज)

पगार किती मिळणार?

ईएसआईसी सामाजिक सुरक्षा अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार ४४,९०० रुपये ते १,४२,४००रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

(हे ही वाचा: Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)

अर्ज कसा करायचा?

esic.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील भरती टॅबवर जा आणि ‘सामाजिक सुरक्षा अधिकारी २०२२ च्या पदावर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी येथे क्लिक करा’ या लिंकवर क्लिक करा. नोंदणी करा आणि अर्ज भरा. अर्ज फी भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करा. तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल. पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट आपल्याजवळ ठेवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esic recruitment 2022 job opportunities for graduates salary more than 1 lakh 40 thousand ttg