सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. काही रिक्त पदांवर भरती करण्यासाठी रेल्वेने अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असणारे उमेदवारही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १६ पदांवर भरती होणार असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख ८ नोव्हेंबर आहे. दक्षिण रेल्वे स्काऊट कोट्याअंतर्गत लेव्हल १ आणि २ च्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेकडून होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये लेव्हल १ च्या १४ आणि लेव्हल २ च्या तीन अशा एकूण १६ पदांवर भरती होणार आहे. लेव्हल १ साठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र किंवा एनसीव्हीटीकडून मिळालेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ या वयोगटातील असावे.

लेव्हल २ च्या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार बारावीमध्ये कमीत कमी ५०% गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. अभियांत्रिकी डिप्लोमासह इतर कोणतीही पात्रता तंत्रज्ञ श्रेणीसाठी वैकल्पिक पात्रता म्हणून स्वीकारली जाणार नाही. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ या वयोगटातील असावे.

अर्ज करणार्‍या एससी/एसटी/माजी सैनिक/पीडब्ल्यूडीएस/महिला/ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, इतर सर्व श्रेणीतील लोकांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक असणारे उमेदवार rrcmas.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway recruitment govt job opportunity in railways for 10th passers know last date of application pvp