BOB Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अग्निशमन अधिकारी (फायर ऑफिसर), व्यवस्थापक (मॅनेजर), वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर), मुख्य व्यवस्थापक (चीफ मॅनेजर) या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://www.bankofbaroda.in/ येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज करण्याची तारीख, अर्ज शुल्क यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BOB Bharti 2024 : पदाचे नाव व पदसंख्या :
अग्निशमन अधिकारी (फायर ऑफिसर) – ०२ पदे.
व्यवस्थापक (मॅनेजर) – १० पदे.
वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर) – ०९ पदे.
मुख्य व्यवस्थापक (चीफ मॅनेजर) – ०१ पदे.
एकूण पदसंख्या – २२ जागा.

BOB Bharti 2024 : नोकरी ठिकाण मुंबई</p>

BOB Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता
प्रत्येक उमेदवाराच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
लिंक – https://drive.google.com/file/d/1Vnvh-n2_XsszjkR6lEFH6JEXGvW6VB1-/view

हेही वाचा…RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदासाठी होणार मेगा भरती; उमेदवार ‘या’ तारखेपासून करू शकतात अर्ज

BOB Bharti 2024 : अर्जाची तारीख
अर्ज करण्याची प्रक्रिया काल १७ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२४ असणार आहे.

BOB Bharti 2024 : अर्ज शुल्क :
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, EWS व OBC उमेदवारांसाठी ६०० रुपये; तर SC, ST आणि महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

  • BOB Bharti 2024 : अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?
  • भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये उमेदवाराने माहिती अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवरून सादर करावा.
  • अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of baroda bharti 2024 announced new recruitment notifications for various posts know more details asp