BMC Bharti 2023: मुंबई महानगरपालिकेने आता वेगवेगळ्या गटातील कंत्राटी नोकरभरतीची सुरुवात केली आहे. याच महाभरतीअंतगर्त आता लोकमान्य टिळक महानगपालिका सर्वसाधारण रुग्णालयात १३५ पदांसाठी भरती होणार आहे. सहा महिन्याच्या कंत्राटी स्वरूपात ही भरती पार पडेल. २३ मार्च २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून ३१ मार्च २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या पदांसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे पात्रतेचे निकष तपासून अर्ज करावा असे आवाहन बीएमसीतर्फे करण्यात आले आहे. अर्जाचे वितरण रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, शिव येथे होत असून रविवार व सार्वजनिक सुट्टीचा वार वगळून हे ३४५ रुपयात हा अर्ज आपण घेऊ शकता. या बीएमसी भरतीचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकूण रिक्त पदे:

१३५ पदे.

पदाचे नाव:

प्रशिक्षित अधिपरिचारिका.

शैक्षणिक पात्रता:

१२ वी उत्तीर्ण + GNM.

वयोमर्यादा:

खुल्या प्रवर्गासाठी- १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सूट.

अर्ज करण्याचा पत्ता

आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय

अर्ज करण्याचा कालावधी

२३ मार्च २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून- ३१ मार्च २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती. जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑल द बेस्ट!

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc bharti 2023 mumbai mahanagar palika jobs for 135 vacant place read details salary upto 30 thousand check deadline svs