CBSE Class 10th, 12th Results: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १३ मे रोजी इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. CBSE इयत्ता 12वीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.gov .in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. यासह DigiLocker वेबसाइट – digilocker.gov.in आणि UMANG ॲपवर सुद्धा आपल्याला निकाल तपासता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

CBSE इयत्ता १२ वी परीक्षेसाठी या वर्षी १६,३३,७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल १६,२१, २२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४,२६,४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या निकालात या वर्षी २४ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, १ लाख १६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा एकुण ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीबीएसईच्या इयत्ता १२वीचा निकाल कसा तपासायचा?

१. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२. सीबीएसईचा बोर्ड निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.

३. खात्यात लॉग इन करा.

हे ही वाचा<< १० वीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी! CBSE ने जाहीर केली टक्केवारी, पुण्याचा नंबर सहावा,’या’ जिल्ह्यातील विद्यार्थी ठरले अव्वल

४. रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

५. तुम्ही आता सीबीएसई बोर्डाचे १२वीचे निकाल तपासू शकता.

६. आपण निकाल तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

CBSE 12th Std Results Declared: मुलींनीच मारली बाजी!

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीच्या टक्केवारीत यंदा मागील वरचीच्या तुलनेत वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ९०. ६८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या तर यावर्षी टक्केवारी ९१.५२ इतकी आहे. दुसरीकडे मुलांच्या बाबतही यंदा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढला आहे. गेल्या वर्षी ८४.६७ टक्के विद्यार्थी (मुले) उत्तीर्ण झाली होती तीच टक्केवारी यंदा ८५. १२ इतकी आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा ५० टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६० टक्के होते. यंदा सुद्धा ६.४० टक्क्यांनी मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली आहे.

हे ही वाचा<< Maharashtra HSC SSC Results: १० वी, १२ वीच्या निकाल आज होणार जाहीर? mahresult.nic.in शिवाय ‘इथे’ लगेच पाहता येतील गुण

दुसरीकडे, आज जाहीर झालेल्या CBSE इयत्ता 12 वीच्या निकालात त्रिवेंद्रममधील उत्तीर्णांची टक्केवारी सर्वाधिक ९९. ९१ टक्के आहे, त्यानंतर विजयवाडा आणि चेन्नईची उत्तीर्णतेची टक्केवारी अनुक्रमे ९९.०४ टक्के आणि ९८. ४७ आहे.या यादीत पुण्याचा क्रमांक हा नववा असून उत्तीर्णांची टक्केवारी ८९.७८ टक्के आहे.

CBSE 12th Results Merit List: बोर्डाचा मोठा निर्णय

विशेष म्हणजे यंदा बोर्डाने कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांमधील द्वेषयुक्त किंवा घातक स्पर्धा टाळण्यासाठी बोर्डाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार, कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही असे सीबीएसईने आज इयत्ता १२ वीचे निकाल जाहीर करताना सांगितले होते. याशिवाय प्रथम, द्वितीय किंवा तृतीय असे रँकिंग सुद्धा विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse 12th results declared live link cbseresults nicin pune ranks nine vijaywada tops 10th std results 2024 expected today later svs