CBSE 10th Board Results Declared: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने आज (१३ मे) रोजी इयत्ता १० वी व १२ वी चा निकाल जाहीर केला आहे. आज सकाळी सुरुवातीला १२ वीचा निकाल घोषित करण्यात आला व आता त्यापाठोपाठ CBSE इयत्ता १०वीचा निकाल सुद्धा जाहीर केला आहे. इयत्ता १० वी चे विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbseresults.nic.in, सह results.digilocker.gov.in आणि umang.gov.in. या ठिकाणी सुद्धा आपला निकाल तपासू शकतात. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि ॲडमिट कार्ड आयडी टाकून सीबीएसई दहावीचा निकाल तपासू शकतात.
प्राप्त माहितीनुसार, यंदा १२ वी प्रमाणेच इयत्ता १० वीच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी सुद्धा वाढली आहे. २०२४ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३. ६० इतकी नोंदवली आहे जी मागील वर्षीच्या ९३. १२ टक्के इतकी होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही त्रिवेंद्रम दहावीच्या निकालात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा ठरला आहे.
निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
सीबीएसईच्या इयत्ता १० वीचा निकाल कसा तपासायचा?
१. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. सीबीएसईचा बोर्ड निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.
३. खात्यात लॉग इन करा.
४. रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
५. तुम्ही आता सीबीएसई बोर्डाचे १० वीचे निकाल तपासू शकता.
६. आपण निकाल तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता.
हे ही वाचा<< १२ वीचा निकाल जाहीर! CBSE मध्ये पुण्याचा नंबर नववा, ‘या’ लिंकवर थेट पाहा रिझल्ट
इयत्ता बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलींनी मुलांपेक्षा २.०४ टक्क्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यावेळी, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २०२३ मधील ९४.२५% वरून ९४.७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण २०२३ मधील ९२.२७ % वरून ९२.७१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.३० इतकी आहे.