Central Bank of India Recruitment 2024  : अनेकांची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे बँकेअंतर्गत अनेकदा जाहीर होणाऱ्या भरतीकडे सर्वांचे लक्ष असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. तब्बल ३०० रिक्त जागा भरण्यासाठी हे अर्ज मागविण्यत आले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करा. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किती, पात्र उमेदवारास किती पगार मिळणार, अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती या विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. ज्या लोकांना शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज भरायचा आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
पदसंख्या – शिकाऊ उमेदवार पदासाठी एकूण ३००० रिक्त जागांकरिता अर्ज मागविले आहे.
शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा
अर्ज पद्धती – अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असावी. त्यामुळे https://nats.education.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करून अर्ज भरावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२४ आहे. त्यापूर्वी अर्ज करावा.
वेतन -पात्र उमेदवारास १५,००० रुपये वेतन दिले जाईल
अधिकृत वेबसाईट – या अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.centralbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.
अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी https://www.centralbankofindia.co.in/sites/default/files/Notification-Engagement-of-Apprentices-2024-25.pdf या लिंकवर क्लिक करून अधिसुचना वाचावी.

हेही वाचा : राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
  • अर्ज २७ मार्च २०२४ या शेवटच्या तारखेपूर्वी भरायचा.
  • अर्जामध्ये विचारलेली माहिती नीट भरावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करावीत.