CBI Bharti 2024 : सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागांतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. https://cbi.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सीबीआयमध्ये या पदासाठी अर्ज प्रकिया सुरू झाली असून, पात्र किंवा इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे आणि तो ४ मेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचा आहे.

रिक्त पद आणि पदसंख्या – सीबीआय एसीबी मुंबई केंद्रीय पोलीस संघटनेमधून (एस) मधून ०४ सेवानिवृत्त / सल्लागार राज्य पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई येथे स्थित ट्रायल कोर्टमध्ये पैरवी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

अनुभव – अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फौजदारी खटल्यांच्या सुनावणीदरम्यान तपास / फिर्यादी / न्यायालयीन कर्तव्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.

हेही वाचा…IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत भरती; ५५ हजारांपर्यंत पगार, असा करा अर्ज

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करणाऱ्या इच्छुक व पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे आरोग्य चांगले असावे आणि कराराच्या आधारावर पैरवी अधिकारी म्हणून ते काम करण्यास इच्छुक असावेत. नमूद पत्त्यावर अर्ज पाठविण्यापूर्वी तो पीपीओ, एलपीसी / वेतनचिठ्ठी (Salary Slip) मागील पाच वर्षांच्या एपीएआरएसच्या प्रतीसह अर्ज जमा (सबमिट) करावी. अपूर्ण अर्ज किंवा महत्त्वाची कागदपत्रे उमेदवाराकडे नसल्यास अर्ज नाकारला जाईल.

पत्ता – सीबीआय सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, १० वा मजला, प्लॉट क्रमांक सी- ३५-ए, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई- ४०००९८.

अधिक माहितीसाठी उमेवाराने खालील लिंकमधील जाहिरात वाचून घ्यावी.

लिंक – https://cbi.gov.in/vacancy-list/MQ==

सर्व अधिसूचना नीट वाचून, मगच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.