COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाअंतर्गत विविध प्राध्यापक पदांसाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी किती पदे रिक्त आहेत याची माहिती नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावी. तसेच, या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता आणि पात्रता निकष काय आहेत हे जाणून घ्यावे. तसेच, उमेदवारांनी नोकरीचा अर्ज कसा करावा आणि अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख काय आहे याची माहिती उमेदवारांनी पाहावी.

COEP Pune recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

प्राध्यापक [Professor] या पदासाठी एकूण १ रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे.
सहयोगी प्राध्यापक [Associate Professor] या पदासाठी एकूण २ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
सहाय्यक प्राध्यापक [Assistant Professor] या पदासाठी एकूण ४ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयाअंतर्गत अशा एकूण ७ रिक्त जागांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : SEBI Recruitment 2024 : सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये होणार नोकरीची भरती!

COEP Pune recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक [Professor] या पदासाठीअर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर्स किंवा मास्टर्सची पदवी, पीएचडी [Ph.D.] असावी. तसेच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव असावा.

सहयोगी प्राध्यापक [Associate Professor] या पदासाठीअर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर्स किंवा मास्टर्सची पदवी, पीएचडी [Ph.D.] असावी. तसेच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात किमान ८ वर्षांचा अनुभव असावा.

सहाय्यक प्राध्यापक [Assistant Professor] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन / C. A. / ICWA मधील बॅचलर्स पदवी असावी. तसेच उमेदवाराकडे M. Com चे शिक्षण असून, संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असावा.

COEP Pune recruitment 2024 – अभियांत्रिकी महाविद्यालय अधिकृत वेबसाइट लिंक –
https://www.coep.org.in/

COEP Pune recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
file:///C:/Users/Online/Downloads/MBA%20Advetisement_%20Faculty_14-06-2024%20(1).pdf

COEP Pune recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही प्राध्यापक पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास त्यांनी तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा वापर करावा.
उमेदवारांनी नोकरीच्या अर्जासह आपले आवश्यक कागदपत्र योग्य पद्धतीने जोडावे.

नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी अर्ज शुल्क भरावा लागणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना १०००/- रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना ५००/- रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.

उमेदवारांनी नोकरीचा अर्ज पाठवण्याआधी, नोकरीची अधिसूचना व्यवस्थित वाचून आणि समजून मगच अर्ज पाठवावा.
नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
नोकरीचा ऑनलाईन अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ जून २०२४ अशी आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. किंवा थेट नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.