Premium

केंद्र सरकारच्या ‘या’ विभागामध्ये होतेय बंपर भरती, जाणून घ्या निवड प्रक्रिया, पात्रता व अन्य निकष

सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

cpcb recruitment 2023
सरकारी नोकरी (फोटो संग्रहित)

CPCB Recruitment 2023: केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी यासंबंधित सूचनापत्र सीपीसीबीद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या cpcb.nic.in. या अधिकृत वेबसाइटवर भरतीशी निगडीत सर्व माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विभागामधील सायंटिस्ट बी, अपर डिव्हीजन क्लर्क, क्लर्क (एलडीसी), एमटीएस अशा एकूण १६३ पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीमधील काही जागांसाठी दहावी, बारावी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तर काही जागा या फक्त पदवीधर उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून केले असणे ही मुख्य अट आहे. पदानुसार वयाच्या अटीसंबंधित नियम बदलले जातील. एकूणच कोणत्या जागेसाठी कोणते निकष लागणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती या मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये नोकरी करायची इच्छा असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी ३१ मार्च २०२३ पूर्वी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. संस्थेच्या वेबसाइटवर त्यांना हा अर्ज मिळेल. ३१ मार्च नंतर अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

आणखी वाचा – मुंबईत आयकर विभागाच्या बॅंकेत काम करण्याची मोठी संधी; ‘या’ पदासांठी भरती, आजच अर्ज करा

प्रत्येक उमेदवाराला भरतीसाठी ऑनलाइन अर्जासह प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १,००० रुपये शुल्क म्हणून द्यावे लागतील. तर आरक्षित वर्गातील उमेदवार, पीडब्लूडी आणि महिला उमेदवारांकडून भरतीसाठी २५० रुपये घेतले जातील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 10:27 IST
Next Story
यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत