India Post GDS Recruitment 2025: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकर अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्टने बंपर पदासाठी भरती काढली आहे. यामध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया इंडिया पोस्टने १० फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जीडीएस ( GDS) रिक्त पदासाठी पात्र असलेले सर्व उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच बातमीत दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरतीतून २१४१३ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये जीडीएसमधील ब्रँच पोस्ट मास्तर (BPM) आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर (ABPM) ही पदे भरली जाणार आहेत.

पात्रता निकष

इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ. यासाठी भारत सरकार/राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांद्वारे आयोजित १०वी इयत्तेची माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे असावी.

वेतन

GDS ला टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउंस (TRCA) च्या स्वरुपात मोबदला दिला जातो, ज्यात GDS नियमांमध्ये दिलेल्या अटींच्या पूर्ततेच्या अधीन ३% ची वार्षिक वाढ असते.

BPM: रु. १२,००० रु. 2९, ३८०/-
ABPM /डाक सेवक: रु.१०,०००/- ते रु.२४,४७०/-

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादी २ दशांशांच्या अचूकतेच्या टक्केवारीवर एकत्रित केलेल्या मान्यताप्राप्त बोर्डांच्या १०वी इयत्तेच्या माध्यमिक शाळा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर/ ग्रेड/गुणांचे गुणांमध्ये रुपांतरण करून तयार केली जाईल.

विभाग GDS ऑनलाइन पोर्टलवर निवडलेल्या अर्जदारांची यादी प्रसिद्ध करेल. निकाल घोषित झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना निकाल आणि शारीरिक पडताळणीच्या तारखा इत्यादींची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल.

अर्ज फी

सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क १००/- आहे. महिला उमेदवार, SC/ST अर्जदार, PwD अर्जदार आणि Transwomen अर्जदारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्जदारांची सूट मिळालेली श्रेणी वगळता अर्जदार, पेमेंटसाठी प्रदान केलेल्या लिंकचा वापर करून कोणत्याही ऑनलाइन पेमेंट पद्धतीद्वारे फी भरू शकतात. यासाठी सर्व मान्यताप्राप्त क्रेडिट/डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा/यूपीआय वापरता येतील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India post gds recruitment 2025 apply for 413 posts at indiapostgdsonline govin link here srk