Indian Army 2024 : भारतीय सैन्याने एनसीसी या विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे. यासाठी एकूण ५६ कोर्सेसची जागा उपलब्ध आहे. या कोर्ससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ६ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार भारतीय सैन्याच्या joinindianarmy.nic.in. या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Indian Army 2024 : रिक्त पदांची माहिती

एकूण ५५ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.

NCC महिला उमेदवार – ५ जागा
NCC पुरुष उमेदवार – ५० जागा

हेही वाचा : Oil India Limited Recruitment 2024 : ऑइल इंडियामध्ये १०२ जागांवर भरती सुरू; अर्ज कुठे अन् कधीपर्यंत करावा, पाहा….

Indian Army NCC Special Entry Scheme 2024 – अधिसूचना –

Click to access NOTIFICATION_FOR_NCC_SPL_ENTRY_MEN_-56_COURSE.pdf

Indian Army 2024 : वयोमर्यादा

नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये [NCC] सामील होऊ इच्छिणारे उमेदवार १ जुलै २०२४ रोजी किमान १९ ते २५ या वयोगटातील असावे ( 2 जुलै 1999 आणि 1 जुलै 2005 दरम्यान जन्मलेले असावे).

Indian Army 2024 : शैक्षणिक पात्रता

NCC ‘सी’ प्रमाणपत्रधारकांसाठी :

इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी किंवा सर्व वर्षांचे मिळून किमान ५० टक्के असणारे पदवी प्रमाणपत्र असावे.
जे त्यांच्या अंतिम वर्षांमध्ये शिकत आहेत, तेदेखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांच्याकडे सुरुवातीचे दोन वर्ष मिळून ५० टक्के इतके गुण असणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास वर दिलेली अधिसूचना वाचावी.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army 2024 apply for ncc special entry scheme what is the last date for application check out dha