IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने पदवीधर उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. तब्बल ५१८ पदांसाठी ही बंपर भरती असणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २० मार्च २०२३ असणार आहे. उपलब्ध जागांचे तपशील, पात्रतेचे निकष, शैक्षणिक पात्रता, व या पदांसाठी वेतन रचना याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. १ मार्च पासून हे अर्ज सुरु होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्ज करण्यापूर्वीच जाणून घ्या की, तुम्हाला अर्जासह खालील कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो

इंडियन ऑईल रिक्त जागा (Indian Oil Vacant Jobs)

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक
  • कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक
  • कनिष्ठ साहित्य सहाय्यक
  • कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in relevant field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक –संबंधित पदांनुसार B.Sc. in Physics, Chemistry/ Industrial Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ साहित्य सहाय्यक – Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engg. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक – B.Sc. (Nursing) or 3 years Diploma in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

हे ही वाचा<< BOI, IDBI, इंडियन बँकेत ७०० हुन अधिक पदांची बंपर भरती; लाखोंनी मिळवा पगार, जाणून घ्या तपशील

इतका मिळणार पगार

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपये

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपये

कनिष्ठ साहित्य सहाय्यक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपये

कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपये

अधिकृत अर्जाचे परिपत्रक इथे डाउनलोड करा.

ऑल द बेस्ट!

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian oil recruitment 2023 graduate candidate will get 25 thousand to 1 lakh salary application on ioclmd in svs