Indian Railway Bharti 2024 : रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रेल्वेत तब्बल ५ हजारून अधिक जास्त जागांसाठी भरती सुरू आहे. या मेगाभरतीचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी सविस्तर वाचा. भारतीय रेल्वेत ५,६९६ पदांसाठी मेगाभरती सुरू केली असून २१ विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सहाय्यक लोको पायलट पदांच्या भरतीसाठी ही प्रक्रिया राबवित आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज कसा करावा, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • पदाचे नाव – भारतीय रेल्वेत २१ विभागात ‘सहाय्यक लोको पायलट’ या खास पदासाठी भरती सुरू आहे.
  • पदसंख्या – ‘सहाय्यक लोको पायलट’पदाच्या एकूण ५६९६ रिक्त जागा आहेत. त्यामुळे या मेगाभरतीचा फायदा अवश्य घ्यावा.
  • वयोमर्यादा – या पदासाठी १८ ते ३० वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. १८ ते ३० वयोगटात येणाऱ्या उमेदवारांनी ही संधी गमावू नये.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवारांचे SSLC plus ITI (१० वी / ITI) शिक्षण आवश्यक आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे.
  • पगार – तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘सहाय्यक लोको पायलट’ पदासाठी किती पगार दिला जाईल? या पदासाठी पात्र उमेदवारास १९,९०० रुपये वेतन दिले जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे . त्यामुळे उशीर करू नका आणि लगेच अर्ज भरा.
  • अर्ज पद्धत – तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • अधिकृत वेबसाइट – https://indianrailways.gov.in/ या अधिकृत बेवसाइटवरुन तुम्ही या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

हेही वाचा :East Central Railway Bharti 2024 : पूर्व मध्य रेल्वेमध्ये ५६ रिक्त पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway bharti 2024 for posts of assistant loco pilot 5696 vacancies read salary and how to apply ndj
First published on: 19-02-2024 at 15:32 IST