IITM Pune Bharti 2023 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM Pune) पुणे अंतर्गत ‘संशोधन सहयोगी II’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ आहे. तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था भरती २०२३ –

पदाचे नाव – संशोधन सहयोगी II

पदसंख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता –

हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ समुद्रशास्त्र/ भौतिकशास्त्र/ उपयोजित भौतिकशास्त्र// गणित/ पृथ्वी विज्ञान किंवा समकक्ष विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी.

किंवा

हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ समुद्रविज्ञान/ पृथ्वी विज्ञान या विषयातील एम.टेक नंतर तीन वर्षांचा संशोधनाचा अनुभव

नोकरी ठिकाण – पुणे</strong>

वयोमर्यादा – ३५ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना मेट्रोत नोकरीचे मोठी संधी! महा-मेट्रो अंतर्गत ‘या’ पदांच्या १३४ जागांसाठी भरती सुरु

निवड प्रक्रिया – मुलाखती

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ३० ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.tropmet.res.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://www.tropmet.res.in/Careers

पगार – या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ४९ हजार पगार मिळणार.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1YBpdClyjOIMC05xJOimKHUT0_upw8bBB/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.