CDAC Mumbai Recruitment 2024 : प्रगत संगणन विकास केंद्र – मुंबई येथे सध्या ‘सहायक’ आणि ‘कनिष्ठ सहायक’ या पदांवर भरती सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे ते लक्षात घ्या. तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व निवड प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CDAC Mumbai Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये एकूण दोन जागांवर भरती होणार आहे.

सहायक पद – १ जागा
कनिष्ठ सहायक पद – १ जागा
एकूण जागा – २

हेही वाचा : DIAT Pune recruitment 2024: पुणे शहरात नोकरी शोधताय? ‘या’ भरतीबद्दल माहिती पाहा

CDAC Mumbai Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

सहायक पद शैक्षणिक पात्रता –

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही विषयाची पदवी असणे आवश्यक आहे. संगणक विषयात किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
संबंधित क्षेत्रात सात वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव असावा.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. वित्तीय क्षेत्रामध्ये एमबीए असल्यास चांगले.

कनिष्ठ सहायक पद शैक्षणिक पात्रता –

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही विषयाची पदवी असणे आवश्यक आहे.
कॉम्प्युटर ऑपरेशन्स विषयात किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण हवा.
पदवीधरांना संबंधित क्षेत्रात तीन वर्षांचा कामाचा अनुभव आणि पदव्युत्तर पदवीधरांना एक वर्षाचा अनुभव असावा.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.

CDAC Mumbai Recruitment 2024 – प्रगत संगणन विकास केंद्र अधिकृत वेबसाइट –
https://www.cdac.in/

CDAC Mumbai Recruitment 2024 – अधिसूचना –
https://careers.cdac.in/advt-details/MB-2022024-88ETP

CDAC Mumbai Recruitment 2024 – ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक –
https://careers.cdac.in/advt-details/MB-2022024-88ETP

CDAC Mumbai Recruitment 2024 : वेतन

सहायक पद – पे मॅट्रिक्सनुसार वेतन २९,२००/- रुपये दिले जाईल.

कनिष्ठ सहायक पद – पे मॅट्रिक्सनुसार वेतन २५,५००/- रुपये दिले जाईल

हेही वाचा : IUCAA Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा ‘या’ पदासाठी होणार भरती…

CDAC Mumbai Recruitment 2024 : वयोमर्यादा

सहायक पदासाठी अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांसाठी ३५ वर्षे अशी वयोमर्यादा आहे.
कनिष्ठ सहायक पदासाठी अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांसाठी ३० वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

CDAC Mumbai Recruitment 2024 : अर्ज आणि निवड प्रक्रिया

सहायक आणि कनिष्ठ सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्याआधी उमेदवाराने भरलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचून, ती अचूक असल्याची खात्री करावी.
अर्ज पाठविल्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा अंतिम तारखेआधी पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२४ अशी आहे.

सहायक आणि कनिष्ठ सहायक या पदांसंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी प्रगत संगणन विकास केंद्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. किंवा या नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना आणि अर्ज करण्याची लिंक वर नमूद केली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jobs in mumbai city cdac recruitment 2024 how to apply for job what is the last date for application check out dha
First published on: 12-03-2024 at 16:04 IST