BMC recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या नोकरीची संधी उपलब्ध आहे. बीएमसीमध्ये क्ष-किरण सहाय्यक [X-Ray Assistant] या पदासाठी भरती होणार आहे. क्ष-किरण सहाय्यक या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे याबद्दल माहिती पाहा. तसेच अर्जासाठी पात्रता निकष काय आहेत, हेदेखील जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BMC recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

क्ष-किरण सहाय्यक या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती होणार आहे.

BMC recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

क्ष-किरण सहाय्यक या पदासाठी इच्छुक उमेदवार –

बारावी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवल्या जाणाऱ्या क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. अशा उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा : CDAC Mumbai Recruitment 2024 : मुंबई शहरात नोकरीची संधी! पाहा ‘या’ पदांसाठी होत आहे भरती

अथवा

उमेदवार बारावी (विज्ञान) / बारावी (MCVC) आणि रेडीओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असावा.

BMC recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकृत वेबसाईट –
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

BMC recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a3%20%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%20%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4.pdf

BMC recruitment 2024 : वेतन

क्ष-किरण सहाय्यक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास १६,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.

BMC recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

क्ष-किरण सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्याचा वापर करावा –
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई-४०००१५.
उमेदवाराने अर्ज पाठवताना त्यामध्ये आवश्यक ती सर्व आणि संपूर्ण माहिती द्यावी.
तसेच दिलेली माहिती ही अचूक असल्याची खात्री करावी. अर्ज अपूर्ण असल्यास नाकारला जाईल, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
क्ष-किरण सहाय्यक या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेआधी भरावा.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही २८ मार्च २०२४ अशी आहे.
क्ष-किरण सहाय्यक या पदासंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधी अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना यांची लिंक वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai city jobs bmc vacancy available for march 2024 how to apply what is the last date for application check out dha
First published on: 13-03-2024 at 19:13 IST