NHAI recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत विविध ‘तज्ज्ञ’ पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. नेमक्या कोणत्या आणि किती पदांसाठी ही भरती निघाली आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहावी. तसेच, या नोकरीचा अर्ज पाठविण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय, तसेच पात्रता निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व आवश्यक गोष्टींबद्दलची माहिती पाहावी. या नोकरीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NHAI recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

प्रिन्सिपल DPR तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

तर डोमेन तज्ज्ञांची भरती खालीलप्रमाणे –

वरिष्ठ महामार्ग तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
रस्ता सुरक्षा तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
वाहतूक तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
पर्यावरण / वन विशेष तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
भूसंपादन तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
भूतंत्र तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
पूल तज्ज्ञ या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
बोगदा तज्ज्ञ या पदासाठी एकूण एका रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे पाच प्रिन्सिपल DPR तज्ज्ञ आणि ३३ मेन तज्ज्ञ मिळून एकूण ३८ जागांवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : IRCTC recruitment 2024 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी! पाहा

NHAI recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वरील सर्व पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची संपूर्ण माहिती नोकरीच्या अधिसूचनेत दिलेली आहे. उमेदवारांनी अधिसूचना वाचून प्रत्येक पदाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती समजून घ्यावी.

NHAI recruitment 2024 – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकृत वेबसाइट लिंक –
https://nhai.gov.in/#/

NHAI recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/vacancy_files/DPR_Expert_Recruitment_notice_Revised.pdf
https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/vacancy_files/Advertisement_DPR.pdf

NHAI recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा वापर उमेदवारांनी करावा.
या नोकरीचा अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांसाठी ५६ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी अर्जात आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
तसेच, गरज असल्यास अर्जासह आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
कोणत्याही नोकरीचा अर्ज पाठविण्याआधी उमेदवारांनी नोकरीची अधिसूचना नीट वाचून मगच अर्ज करावा.

वरील नोकरीसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nhai recruitment 2024 national highways authority of india is hiring on various post check out dha