PCMC Bharti 2023: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे पालिकेतील जवळपास २०३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी मुलाखत देण्याची तारीख १५ मे २०२३ ते १७ मे २०२३ पर्यंत आहे. या भरती संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी PCMC ची अधिकृत वेबसाइट http://www.pcmcindia.gov.in ला अवश्य भेट द्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय), यमुनानगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय व इतर ठिकाणी कामकाजाकरिता पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी करारनामा करून (WALK IN INTERVIEW ) द्वारे ११ महिने कालावधीसाठी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या रुग्णालयांतील विविध विभागांकरिता आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी १५ मे ३ ते १७ मे २०२३ ला सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत, तसेच त्यापुढील प्रत्येक सोमवारी रिक्त जागांनुसार खालील पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा- इंजिनीअर्सना बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी! या पदासांठी भरती सुरु, २९ मे पूर्वी भरा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव – कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार,, बालरोग विभाग (कन्सल्टंट) ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, बालरोग विभाग (हाऊसमन), मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट), मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार, रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार. आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, नेत्रतज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, कान, नाक, घसा (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार

एकूण पदसंख्या – २०३

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रेसाठी https://drive.google.com/file/d/1s5JBqZEUlJyMrVTHm5ksTKlEieHeLrWa/view?usp=sharing या लिंकवरील मूळ जाहिरात अवश्य पाहा.

अधिकृत वेबसाईट – http://www.pcmcindia.gov.in

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे

वयोमर्यादा – ५८ वर्षांपर्यंत

अर्जाची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८

मुलाखतीची तारीख – १५ ते १७ मे २०२३

पगार – भरतीअंतर महिना ८० हजार ते १ लाख २५ हजारांपर्यंत पगार मिळणार.