पुणे शहरात आणि पुणे महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिका (PMC) येथे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका भरती २०२३ अंतर्गत एकूण ६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे महानगरपालिका भरती २०२३ –

हेही वाचा- HSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा! पदवी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट ‘या’ दिवशी लागणार

पदाचे नाव – समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक

एकूण पद संख्या – ६२

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी https://drive.google.com/file/d/1ZBdDwOZLPl-edaDEoV266hk4TgUeE_kr/view या लिंकवरील भरतीची जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत्त – ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जुन २०२३

मुलाखतीची तारीख – ८ जुन २०२३

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

महापालिकेची अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

आवश्यक कागदपत्र –

  • पासपोर्टसाईज फोटो –
  • जन्मतारखेकरीता (वयाचा दाखला/ दहावीची टीसी / जन्म प्रमाणपत्र)
  • फोटो आयडी / रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका / रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र / अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी / नोंदणी नूतनीकरण / अनुभव प्रमाणपत्र) या अनुषंगाने इतर आवश्यक सत्य प्रत / साक्षांकित प्रती )
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mahanagarpalika bharti 2023 pmc has started recruitment for 62 posts you can apply till june 7 jap
First published on: 05-06-2023 at 11:39 IST