Pune Municipal Corporation Bharti 2025: पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महापालिकेतील विविध विभागांत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात आहेत. या भरतीतून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक या पदांची भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांना https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर अधिकची माहिती मिळू शकते. या भरतीतून एकूण ५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीत भाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी या भरतीसाठी मुलाखती होणार आहेत. पद, वेतन, श्रेणी, वयोमर्यादा, शिक्षण तसेच अर्ज कसा भरायचा ही सगळी माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदासांठी भरती होत आहे. मुलाखतीतून या भरतीतील विविध पदांची निवड होणार आहे. ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-४११०११०’ या पत्त्यावर मुलाखती होणार आहेत. २० फेब्रुवारी २०२५ रोजी मुलाखती होणार आहेत.

पदाचे नाव रिक्त जागा

  • प्राध्यापक ०४ जागा
  • सहयोगी प्राध्यापक ११ जागा
  • सहायक प्राध्यापक १६ जागा
  • वरिष्ठ निवासी १६ जागा
  • कनिष्ठ निवासी ०३ जागा
  • एकूण रिक्त जागा ५०

Pune muncipal corporation bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता –

  • प्राध्यापक: MD/MS/DNB
  • सहयोगी प्राध्यापक: MD/MS/DNB
  • सहाय्यक प्राध्यापक: MD/MS/DNB
  • वरिष्ठ निवासी – MD/MS/DNB
  • कनिष्ठ निवासी – MBBS

Pune mahanagarpalika bharti 2025 age limit: वयोमर्यादा –

  • प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ५५ वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ५० वर्षे
  • सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे
  • ज्येष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे
  • कनिष्ठ रहिवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे

Pune Municipal Corporation recruitmet 2025 Salary detail: पदांनुसार मासिक वेतन –

  • प्राध्यापक- १ लाख ८५ हजार
  • सहयोगी प्राध्यापक – १ लाख ७० हजार
  • सहायक प्राध्यापक- १ लाख रुपये
  • वरिष्ठ निवासी – ८० हजार २५०
  • कनिष्ठ निवासी – ६४ हजार ५५१

अधिसूचना –

अधिक माहितीसाठी ही अधिसूचना पाहा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation recruitment 2025 apply online vacancy in bharatratna atal bihari vajpayee medical college bavmc srk