Premium

UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – १९

‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ या उपक्रमांतर्गत दर रविवारी तुमच्या यूपीएससी-एमपीएससी परिक्षेच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे

loksatta test series
लोकसत्ता टेस्ट सिरीज – १९ ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न क्र. १

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?

अ) संसद सदस्य हे मतदारांद्वारे निवडलेले किंवा कोणत्याही सभागृहातील जागेसाठी प्रस्तावित केलेले असतात.

ब) राज्यसभेचे सदस्य राज्य विधानसभेच्या सदस्यांद्वारे आनुपातिक प्रतिनिधित्वाद्वारे निवडले जातात.

क) संसदेची अधिकृत सदस्यसंख्या लोकसभेत ५४४ आणि राज्यसभेत २४६ आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) फक्त ब

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. २

पृथ्वीवरील ‘भूमिगत पाण्याचा भाग’ कधी शोधला गेला?

पर्यायी उत्तरे :

१) २००५

२) २००७

३) २००९

४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. ३

महाद्वीपीय उतार महासागर खोऱ्यांच्या एकूण क्षेत्रफळाच्या सरासरी ……. व्यापतात.

पर्यायी उत्तरे :

१) ८.५ %

२) ७५.५%

३)७.५%

४) ६.५%

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – १७

प्रश्न क्र. ४

महासागरात पाण्याच्या तापमानाची सरासरी वार्षिक श्रेणी/कक्षा किती असते?

पर्यायी उत्तरे :

१) १२° से

२) १०° से

३) -१२° से

४) -१०°से

प्रश्न क्र. ५

……… मीटर खोलीच्या खाली समुद्राच्या तापमानात होणारा बदल नगण्य आहे.

पर्यायी उत्तरे :

१) २०

२) २००

३) २०००

४) यापैकी नाही

प्रश्न क्र. ६

खालीलपैकी कोणते अयोग्य विधान/ने ओळखा?

अ) भारतीय राज्यघटनेचा भाग १४ निवडणुकांशी संबंधित आहे.

ब) भारतीय संविधानातील अनुच्छेद १६ नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

क ) २५ जानेवारी १९५२ रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) फक्त अ

४) वरील सर्व

प्रश्न क्र. ७

समुद्राच्या पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानात नोंदवली जाते?

पर्यायी उत्तरे :

१) १.३° से

२) -१.३° से

३) १३° से

४) -१३° से

प्रश्न क्र. ८

प्रश्न २. समुद्राच्या पाण्याची घनता खालील कोणत्या घटकाशी संबंधित नाही?

पर्यायी उत्तरे :

१) तापमान

२) दाब

३) विरघळलेल्या पदार्थांची क्षारता

४) जमिन व पाण्याचे असमान वितरण

प्रश्न क्र. ९

केंद्रीकृत वेब पोर्टल (UDGAM) संदर्भात योग्य विधान/ने ओळखा?

अ) हे पोर्टल आरबीआयने विविध खातेदारांना एकाच ठिकाणी आपल्या ठेवींचा शोध घेता यावा आणि व्यवहार करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी निर्माण केले आहे.

ब) खातेदार/हे पोर्टल वापरणारा सर्व बँकांमधील ‘अन्क्लेम्ड डिपॉझिट्स’चे तपशील पाहू शकतो.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त २

३) १ आणि २ दोन्ही

४) १ किंवा २ नाही

प्रश्न क्र. १०

खारटपणामुळे समुद्राच्या पाण्याची घनता ………

पर्यायी उत्तरे :

१) कमी होते

२) वाढते

३) काहीच बदल होत नाही

४) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न क्र. ११

डिजिटल पेमेंट इंडेक्सचे लोकार्पण कोणी केले ?

पर्यायी उत्तरे :

१) अर्थ मंत्रालय

२) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)

३) भारतीय रिझर्व्ह बँक

४) इंडियन फायनान्स असोसिएशन

प्रश्न क्र. १२

क्षारतेचे नियंत्रण करणारे घटक ओळखा.

पर्यायी उत्तरे :

१) पर्जन्य

२) बाष्पीभवन

३) महासागरी प्रवाह

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १३

खालीलपैकी कोणता गाळ महासागरी गाळामध्ये समाविष्ट होत नाही?

पर्यायी उत्तरे :

१) उल्कापात गाळ

२) पेलागिक गाळ

३) ज्वालामुखीचा गाळ

४) यापैकी नाही

प्रश्न क्र. १४

पेलाजिक निक्षेप सुमारे …………. % महासागर क्षेत्र व्यापतात.

पर्यायी उत्तरे :

१) ५.५

२) ७५.५

३) ८५.५

४) ९५.५

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – १८

प्रश्न क्र. १५

खालीपैकी योग्य विधान/ने ओळखा?

अ) मुख्य निवडणूक आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे. इतर निवडणूक आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही.

ब) मुख्य निवडणूक आयुक्तांचा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमान असतो.

क) जर एखाद्या बाबतीत मुख्य निवडूक आयुक्त आणि इतर आयुक्तांमध्ये मतभेद निर्माण झाले तर, त्याचा निर्णय बहुमताने घेतला जातो.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क

२) ब आणि क

३) फक्त ब

४) अ आणि क

प्रश्न क्र. १६

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?

अ) भारतीय संसद ही देशातली सर्वोच्च विधिमंडळ संस्था आहे.

ब) संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे अधिवेशन बोलवण्याचा, ते स्थगित करण्याचा किंवा विधिमंडळाचा प्रमुख म्हणून लोकसभा विसर्जित करण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रपतींना असतो.

क) केवळ पंतप्रधान आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती या अधिकारांचा वापर करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) फक्त क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १७

ट्रेड सेटलमेंटच्या संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या.

अ) एकदा लिस्टेड कंपनीच्या खरेदी केलेल्या सिक्युरिटीज खरेदीदाराला दिल्यावर आणि विक्रेत्याला पैसे मिळाल्यावर ट्रेड सेटलमेंट पूर्ण झाले, असे म्हणतात.

ब) ‘T+1’ सायकल म्हणजे ट्रेड सेटलमेंट हे वास्तविक व्यवहाराच्या ४८ तासांपूर्वी होतात.

क) ‘T+1’ ही सेटलमेंट सायकल सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

वरील विधानांपैकी किती विधाने योग्य आहेत?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ ब आणि क

४) वरीलपैकी कोणतेही नाही

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे :

प्रश्न क्र. १- १

प्रश्न क्र. २- २

प्रश्न क्र. ३- १

प्रश्न क्र. ४- ३

प्रश्न क्र. ५- ३

प्रश्न क्र. ६- ४

प्रश्न क्र. ७- २

प्रश्न क्र.८- ४

प्रश्न क्र. ९- २

प्रश्न क्र. १०- २

प्रश्न क्र. ११- ३

प्रश्न क्र. १२- ४

प्रश्न क्र. १३- ४

प्रश्न क्र. १४- २

प्रश्न क्र. १५- ४

प्रश्न क्र. १६-४

प्रश्न क्र. १७- १

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc loksatta test series history ecomics polity geography evs question set 19 spb

First published on: 01-10-2023 at 11:19 IST
Next Story
ITI, डिप्लोमा आणि B.Sc उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा