UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १

जलशास्त्रीय दुष्काळाचे (Hydrological Drought) खालीलपैकी कोणता/ते प्रकार नाहीत?

पर्यायी उत्तरे :

१) भूजल दुष्काळ
२) कृषीतील दुष्काळ
३) भूपृष्ठावरील दुष्काळ
४) यापैकी नाही

प्रश्न क्र. २

खालीलपैकी योग्य विधान ओळखा:

अ) लोकसभा विसर्जित होत असताना लोकसभा अध्यक्षांचे पद लगेच रिक्त होत नाही. नवनिर्वाचित लोकसभेची बैठक होईपर्यंत ते सभागृहाचे कामकाज बघतात.

ब) लोकसभा अध्यक्षांची नेमणूक ही संसदेच्या साधारण बहुमताने केली जाते.

क) लोकसभा अध्यक्षपद हे घटनात्मक पद नाही.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त अ
४) फक्त क

प्रश्न क्र. ३

जेव्हा पाऊस सरासरी पर्जन्याच्या ………..% पेक्षा कमी असतो तेव्हा दुष्काळ पडतो.

पर्यायी उत्तरे :

१) २०
२) ४०
३) ७५
४) २५

प्रश्न क्र. ४

कोसी नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात?

पर्यायी उत्तरे :

१) उत्तर प्रदेश
२) बिहार
३) पंजाब
४) आसाम

प्रश्न क्र. ५

विधान अ : १९११ मध्ये भारताच्या राजधानीचे ठिकाण पूर्व भारतामधून पश्चिम भारतात बदलण्यात आले.

स्पष्टीकरण ब : १९११ मध्ये ब्रिटिश सम्राट जॉर्ज पंचम यांचे दिल्लीत आगमनासाठी दिल्ली दरबार भरविण्यात आला होता.

पर्यायी उत्तरे :

अ) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ब) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
क) विधान अ बरोबर व ब चूक.
ड) विधान अ चूक व ब बरोबर

प्रश्न क्र. ६

जगभरातील पुरामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ………% मृत्यू भारतात होतात.

पर्यायी उत्तरे :

१) ५
२) १०
३) २०
४) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न क्र. ७

अतिशय उच्च असुरक्षितता भूस्खलन क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या भागाचा समावेश होत नाही?

पर्यायी उत्तरे :

1) उत्तर प्रदेश
2) निलगिरी पर्वत
3) आसाम
4) अंदमान निकोबार

प्रश्न क्र. ८

खाणकामामुळे भूस्खलन कोणत्या भागात होते?

पर्यायी उत्तरे :

१) उत्तराखंड
२) ओडिशा
३) उत्तर प्रदेश
४) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न क्र. ९

पृथ्वीवरील भूमिगत पाण्याचा भाग’ कधी शोधला गेला?

पर्यायी उत्तरे :

१) २००५
२) २००७
३) २००९
४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. १०

महाद्वीपीय उतार महासागर खोऱ्यांच्या एकूण क्षेत्रफळाच्या सरासरी ……. व्यापतात.

पर्यायी उत्तरे :

१) ८.५ %
२) ७५.५%
३) ७.५%
४) ६.५%

प्रश्न क्र. ११

लोकलेखा समितीसंदर्भातील योग्य विधान ओळखा :

अ) लोकलेखा समिती सार्वजनिक खर्चाची तपासणी करते.
ब) लोकलेखा समिती ही माँटेगु चेम्सफोर्ड सुधारणांच्या आधी अस्तित्वात आली.
क) भारताचे महान्यायवादी संघाच्या खर्चाचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा अहवाल संसदेला सादर करतात.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) अ आणि क
३) फक्त क
४) फक्त ब

प्रश्न क्र. १२ :

मॉर्ले-मिंटो सुधारणा कायद्यामागे ब्रिटिशांचा खालीलपकी कोणता उद्देश होता?

पर्यायी उत्तरे :

अ) सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देणे.
ब) भारतीयांचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व वाढवणे.
क) भारतीयांना राजकीय फायदा मिळवून देणे.
ड) वरीलपैकी नाही.

प्रश्न क्र. १३ :

१९१९ च्या अधिनियमाबाबत खालील विधाने लक्षात घ्या.

१) या कायद्यानुसार भारत सचिवाचे वेतन भारतीय तिजोरीतून देणे बंद झाले.

२) भारत सचिवाच्या साहाय्यासाठी इंडियन हाय कमिशनर पदाची नियुक्ती करण्यात आली.

३) इंडियन हाय कमिशनरला ब्रिटिश सरकारकडून वेतन मिळणार होते.

वरील विधानांपकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत ते सांगा.

पर्यायी उत्तरे :

अ) फक्त १ व ३
ब) फक्त २
क) फक्त ३
ड) फक्त २ व १

प्रश्न क्र. १४ :

खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१) ‘भारत माता सोसायटी’ नावाची क्रांतिकारी संघटना पंजाब या ठिकाणी कार्यरत होती.

२) भारत माता सोसायटीमध्ये अजित सिंह, लाला हरदयाल व जे. एम. चटर्जी हे क्रांतिकारक होते.

पर्यायी उत्तरे :

अ) विधान १ बरोबर
ब) विधान २ बरोबर
क) विधान १ व २ बरोबर
ड) विधान १ व २ चूक

प्रश्न क्र. १५

खालीलपैकी योग्य विधान ओळाखा :

अ) अकरावी पंचवार्षिक योजना पंतप्रधानपदी मनमोहन सिंग असताना लागू करण्यात आली होती.

ब) अकराव्या पंचवार्षिक योजनेद्वारे शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे सबलीकरण​ करणे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) फक्त ब
३) फक्त अ

प्रश्न क्र. १६

भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना कोणत्या देशापासून घेतली आहे.

पर्यायी उत्तरे :

अ) रशिया
ब) इंग्लंड
क) अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ड) जर्मनी

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे :

प्रश्न क्र. १-२
प्रश्न क्र. २-१
प्रश्न क्र. ३-३
प्रश्न क्र. ४-२
प्रश्न क्र. ५-४
प्रश्न क्र. ६-३
प्रश्न क्र. ७-१
प्रश्न क्र. ८-२
प्रश्न क्र. ९-२
प्रश्न क्र. १०-१
प्रश्न क्र. ११-२
प्रश्न क्र. १२-१
प्रश्न क्र. १३-३
प्रश्न क्र. १४-३
प्रश्न क्र. १५-१
प्रश्न क्र. १६-१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.