UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रश्न क्र. १

पुढीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

१) विमान वाहतूकीचे भारतात आकार व स्वरूपावर प्रथम वर्गापासून सहाव्या वर्गापर्यंत वर्गीकरण केले जाते.

२) मुंबई हे एक राष्ट्रीय विमानतळ आहे.

३) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे अतिरिक्त विमानतळाची उभारणी केली आहे.

४) वरीलपैकी एकही योग्य नाही.

प्रश्न क्र. २

पुढील विधाने लक्षात घ्या.

१) महाराष्ट्रात एकूण ४९ बंदरे आहेत.

२) २५ मार्च २०१५ ला मंत्रीमंडळाने सागरमाला कार्यक्रमास परवानगी दिली होती.

३) बंदर विकास धोरण, २०१६ सालचे आहे.

४) जेएनपीटी बंदर मुंबईत बंदरावरील भर कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे.

पर्यायी उत्तरे :

१) १ व २ योग्य

२) २ व ३ योग्य

३) ३, २ व १ योग्य

४) वरील सर्वच योग्य

प्रश्न क्र. ३

पुढील विधाने लक्षात घेऊन योग्य असलेले अचूक विधान निवडा.

१) कोल्हापूरचे रेणुकादेवी देऊळ प्रसिद्ध आहे.

२) चतुःशृंगी देऊळ नांदेड येथे आहे.

३) भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यास मान मिळाला आहे.

४) वरीलपैकी एकही योग्य नाही.

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही?

१) सिद्धिविनायक सिद्धटेक हे पुणे जिल्ह्यात आहे.

२) वेरूळ लेणी मधे एकूण ३४ लेणी असून तिथे केवळ बौद्ध धर्माचा शिल्प आविष्कार बघायला मिळतो.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त २

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्ही नाहीत

प्रश्न क्र. ५

महाराष्ट्रातील नैसर्गिक पर्यटनविषयक अयोग्य वाक्य निवडा.

१) चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे.

२) महाराष्ट्रात चिखलदर्‍याच्या आसपास चहाचे उत्पादन घेतले जाते.

३) म्हैसमाळला ‘मराठवाड्याचे महाबळेश्वर’ असे म्हणतात.

४) सलबर्डी येथे गरम पाण्याचे झरे आहेत.

प्रश्न क्र. ६

पुढीलपैकी अयोग्य वाक्य कोणते ते ओळखा.

१) अकोला जिल्ह्यातील नळदुर्ग या किल्ल्यावर पाणी महाल आहे.

२) पुण्याजवळ प्रसिद्ध किल्ला सिंहगड आहे.

३) महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला कळसूबाई हा आहे.

४) वरील सर्व विधाने योग्य आहेत.

प्रश्न क्र. ७

१) २०११ च्या आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी जमातीचे प्रमाण आहे.

२) २०११ च्या आकडेवारीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी जमातीचे प्रमाण आहे.

३) २०११ च्या आकडेवारीनुसार, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी जमातीचे प्रमाण आहे.

४) वरीलपैकी एकही योग्य नाही

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती आदिवासी जमात विशेषतः धोक्यात असलेल्या जमाती गटात समाविष्ट नाही?

१) ठाकर

२) काथोडी

३) गोंड

४) कोलम

प्रश्न क्र. ९

ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली?

अ) किचकवध

ब) सुभद्राहरण

क) सौभद्र

ड) कट्यार काळजात घुसली

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) अ आणि ब

३) क आणि ड

४) फक्त ब

प्रश्न क्र. १०

खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचलन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?

पर्यायी उत्तरे :

अ) लोकसभा निवडणुका

ब) राज्यसभा निवडणूका

क) स्थानिक स्वशासन निवडणुका

ड) राष्ट्रपती निवडणूक

प्रश्न क्र. ११

जून २२, १८९७ रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रँड आणि एच. आयर्स्टन यांनी पुणे येथे चाफेकर बंधूंनी का मारले?

पर्यायी उत्तरे :

अ) मुंबई प्रांतात भारतीयांच्या विरोधात कुप्रसिद्ध उपाययोजना करण्यामुळे.

ब) मुंबई सरकारला भारतीयांच्या विरोधात खोटे रिपोर्ट पाठवणे यामुळे.

क) प्लेगच्या साथीचे नियंत्रण करण्यात पुणे येथे वापरण्यात आलेल्या जाचक उपाययोजनांमुळे

ड) भारतीयांना कुठल्याही चौकशी शिवाय अटक करण्यामुळे.

प्रश्न क्र. १२

जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली?

पर्यायी उत्तरे :

अ) कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे

ब) ब्रह्मगिरी बुवा, गणेश वैद्य

क) दत्तात्रय पांडुरंग जोशी, सिद्धनाथ काणे

ड) वामन फडके, निरंजन पाल

प्रश्न क्र. १३

अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या.

अ) तिच्या घुसणे पासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येतो जर त्याला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर

ब) राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्याची लिखित स्वरूपात शिफारस केली असेल तर

पर्यायी उत्तरे :

अ) विधान अ बरोबर
ब) विधान ब बरोबर
क ) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चुकीची

प्रश्न क्र. १४

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर……

अ) राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या 2/3 सदस्यांनी तसा ठराव केला.

ब) राज्यपाल यांच्यामते राज्यांमध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे.

क) विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला.

ड) राज्य कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला.

पर्यायी उत्तरे :

१ ) अ आणि ब

२) अ,ब आणि ड

३) ब आणि क

४) अ आणि ड

वरील प्रश्नांचे उत्तरे :

प्रश्न क्र. १ -३
प्रश्न क्र. २ -४
प्रश्न क्र. ३ -३
प्रश्न क्र. ४-४
प्रश्न क्र. ५-२
प्रश्न क्र. ६ -१
प्रश्न क्र. ७ -२
प्रश्न क्र. ८ -१
प्रश्न क्र. ९ -१
प्रश्न क्र. १०-३
प्रश्न क्र. ११-३
प्रश्न क्र. १२-१
प्रश्न क्र. १३-४
प्रश्न क्र. १४-३

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series polity geography history ecomics arts and culture envoirnment question set 26 spb