आम आदमी पक्षाचे नेते, माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सत्येंद्र जैन यांना आता पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे. आरोग्याच्या कारणास्व त्यांना काही दिवसांपूर्वी दीड महिन्यांसाठी अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, यानंतर हा जामीन वाढत गेला आणि त्यांच्या जामीनाला नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. यानंतर सत्येंद्र जैन यांनी पुन्हा आणखी वेळ मिळण्याची मागणी केली. पण ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावत सत्येंद्र जैन यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्येंद्र जैन यांच्यावर काय आरोप आहेत?

सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदावर असताना काही कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामध्ये ४ कोटी ८१ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून या प्रकरणात सत्येंद्र जैन यांची अनेकदा चौकशीदेखील झाली. मात्र, सत्येंद्र जैन हे योग्य माहिती देत नसल्याने ३० मे २०२२ रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.

सत्येंद्र जैन काही काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना न्यायालयाने २६ मे २०२३ रोजी प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला होता. हा अंतरिम जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. यामध्ये कोणतेही राजकीय भाष्य करायचे नाही, माध्यमांशी संवाद साधायचा नाही, यासह अनेक अटींचा समावेश होता. सत्येंद्र जैन अद्याप उपचार घेत आहेत. पण अंतरिम जामिनाचा कालावधी संपत आल्यामुळे त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा : ‘सत्येंद्र जैन यांची रवानगी दिल्लीबाहेरील तुरुंगात करा,’ भाजपाची मागणी

४.८१ कोटींची संपत्ती जप्त

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबाशी संबंधित तब्बल ४.८१ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली संपत्ती बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. तर सत्येंद्र जैन यांच्यावर झालेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आम आदमी पक्षाकडून फेटाळण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap leader satyendar jain bail application has rejected by supreme court in money laundering case gkt