अपात्रतेनंतर राहुल गांधी खासदार म्हणून मिळणाऱ्या कोणत्या सोयी-सुविधा गमावणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार म्हणून मिळणाऱ्या विविध सुविधा कमी होणार आहेत.

Rahul Gandhi get angry in pc, Modi surname case update
फोटो -एएनआय वृत्तासंस्था

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्या अशा कर्जबुडव्या फरार व्यापाऱ्यांसह नरेंद्र मोदी यांचं नावं घेतं, राहुल गांधींनी “सर्व चोर मोदीच का असतात?” असा सवाल विचारला होता. याप्रकरणी गुजरातमधील भाजपाच्या एका आमदाराने राहुल गांधींविरोधात फिर्याद दाखल केली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

राहुल गांधींनी मोदी समुदायाचा अवमान केला असा आरोप संबंधित भाजपा आमदाराने केला. याप्रकरणी सूरतमधील एका न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा- “…तर बाळासाहेबांनी अमित शाहांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं”, एकनाथ शिंदे यांचं विधान

या संपूर्ण घटनाक्रमानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. आपण कुठल्याही समुदायाचा अवमान केला नाही, असं स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिलं. माझं वक्तव्य ओबीसी समुदाच्या अवमानसंदर्भात नव्हतं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यातील संबंधांबाबत होतं. अदाणी यांच्या बनावट कंपनीत २० हजार कोटी रुपये कुणी गुंतवले असा सवालही राहुल गांधींनी यावेळी विचारला.

हेही वाचा-“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीका

पण राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांना खासदार म्हणून मिळणाऱ्या अनेक सोयीसुविधा बंद होणार आहेत. लोकसभा खासदारांना दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो. शिवाय परवाना शुल्क भरल्यानंतर खासदारांना फ्लॅट किंवा बंगल्याच्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था मिळते. त्याचबरोबर खासदारांना मतदारसंघ भत्ता म्हणून ७० हजार रुपये मिळतात. तसेच कार्यालयीन खर्चासाठी दरमहा ६० हजार रुपये भत्ता मिळतो. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना या सुविधा मिळणं बंद होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 23:21 IST
Next Story
VIDEO: पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक, नरेंद्र मोदींच्या दिशेनं तरुण धावत आला अन्…
Exit mobile version