Bangladesh : बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी उसळलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं. यानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने काही दिवसांपूर्वी बांगलादेशी इस्लामिक कट्टरपंथी जसीमुद्दीन रहमानी याला तुरुंगातून सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान, जसीमुद्दीन रहमानीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केलेल्या एका आवाहनाची चर्चा रंगली आहे. “बंगालला मोदींच्या राजवटीतून मुक्त करून स्वतंत्र घोषित करा”, असं विधान जसीमुद्दीन रहमानीने केल्याचं इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये जसीमुद्दीन रहमानी दिल्लीमध्ये इस्लामिक झेंडे फडकवा, असं भारताविरोधात वक्तव्यही केलं आहे. रहमानीने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इशारा दिला की, “बांगलादेश सिक्कीम किंवा भूतानसारखा नाही. हा १८ कोटी मुस्लिमांचा देश आहे. जर तुम्ही बांगलादेशच्या दिशेने गेलात तर आम्ही चीनला सिलिगुडी कॉरिडॉर बंद करण्यास सांगू आणि आम्ही उत्तर-पूर्व भारत यांना स्वातंत्र्याची मागणी करण्यास प्रोत्साहित करू”, असं विधान केलं आहे.

हेही वाचा : Rape Attempt on Nurse: बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने वार; नर्सच्या धाडसामुळं अनर्थ टळला, आरोपींना अटक

दरम्यान, जसीमुद्दीन रहमानीला हत्येच्या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. जसीमुद्दीन रहमानीने म्हटलं की, “आम्ही पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना बंगालला मोदींच्या राजवटीतून मुक्त करण्यास आणि स्वातंत्र्याची घोषणा करण्यास सांगू” असं म्हटलं आहे. रहमानीने काश्मीरवर बोलताना पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला. काश्मिरींना थेट आवाहन करत म्हटलं की, “मी काश्मिरींना सांगू इच्छितो की, स्वातंत्र्यासाठी तयार राहा. मला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून काश्मीरला पाठिंबा द्यायचा आहे. मी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्याचे आवाहन करतो. मला पाकिस्तान, अफगाणिस्तानला सांगायचंय की काश्मीरला मदत करा, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी काम करा”, असं विधान केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh leader jasimuddin rahmani on west bengal cm mamata banerjee gkt