भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ अशी ओळख असलेल्या बंगळुरू शहरात वाहतुकीची स्थिती अत्यंत वाईट आहे. डच कंपनी टॉमटॉमने नुकताच प्रकाशित केलेल्या ट्रॅफिक अहवालानुसार वाहतुकीच्याबाबतीत बंगळुरू हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं गजबजलेलं शहर असल्याचं पुढे आहे. तर लंडन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे २०२१ मध्ये याच यादीत बंगळुरू हे दहाव्या स्थानावर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधीने ट्रान्सजेंडर महिलेला सर्वांसमोर विचारला लाजिरवाणा प्रश्न; व्हिडिओ व्हायरल

टॉमटॉमच्या अहवालानुसार, सीटी सेंटर श्रेणीमध्ये बंगळुरूतील नागरिकांना १० किमी प्रवास करण्यासाठी २९ मिनिटे १० सेकंदाचा वेळ लागतो. तर लंडनमधील नागरिकांना १० किमीचे अंतर पार करण्यासाठी ३६ मिनिटे २० सेंकदाचा वेळ लागतो. महत्त्वाचे म्हणजे या बाबतीत पुणे सहाव्या स्थानावर असून मुंबई ४७ व्या तर दिल्ली ३४ व्या स्थानावर आहेत.

मेट्रो सिटी श्रेणीमध्ये बोगोटा पहिल्या स्थानावर तर त्यानंतर अनुक्रमे मनिला ( इटली), सपोरो (जपान) आणि लिमा यांचा क्रमांक लागतो. या श्रेणीमध्ये बंगळुरू पाचव्या स्थानावर, तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे नागोया, पुणे आणि टोकियो या शहरांचा क्रमांक लागतो. मेट्रो सिटी श्रेणीमध्ये बंगळुरूतील नागरिकांना १० किमी अंतर पार करण्यासाठी २३ मिनिटे ४० सेंकदाचा वेळ लागतो.

हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात दाखल होणार; वायूसेनेच्या विशेष विमानाने येणार चित्त्यांची दुसरी तुकडी

सीटी सेंटर आणि मेट्रो सिटी श्रेणी म्हणजे काय?

शहराच्या पाच किमी रेडियस असेलल्या क्षेत्राला ‘सीटी सेंटर’ श्रेणी म्हणतात. तर संपूर्ण शहराच्या क्षेत्राला ‘मेट्रो सिटी’ श्रेणी म्हणतात. यामध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही समावेश होतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru is second most congested city in 2022 after london by tom tom trafic index spb