Premium

“देशात कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण नाही, कारण…”; असदुद्दीन ओवैसींचं मोठं विधान, म्हणाले…

सत्ताधारी भाजपावर देशात धार्मिक धृवीकरण केल्याचा आरोप वारंवार होतो. मात्र, असदुद्दीन ओवैसी यांनी देशात कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण नसल्याचं मोठं विधान केलं.

Asaduddin-Owaisi-1
असदुद्दीन ओवैसींचं धार्मिक धृवीकरणावर मोठं विधान (संग्रहित छायाचित्र)

सत्ताधारी भाजपावर देशात धार्मिक धृवीकरण केल्याचा आरोप वारंवार होतो. यावरून विरोधकांनी अनेकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, अशातच ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील धार्मिक धृवीकरणावर मोठं विधान केलं आहे. देशात कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण होत नाही, असा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केला. ते शुक्रवारी (२ जून) इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “माझ्यामते कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण होत नाहीये. कारण धार्मिक धृवीकरण होण्यासाठी समान ताकदीच्या दोन बाजू असाव्या लागतात. सध्या या दोन बाजूच अस्तित्वात नाहीत. वास्तवात भाजपा बहुसंख्यांकवादाचा वापर करून द्वेषाचं राजकारण करत आहे. त्यामुळेच मी धार्मिक धृवीकरण होत नसल्याचं म्हणत आहे.”

“भाजपाने कधीनव्हे एवढं मुस्लिसांचं खच्चीकरण केलं”

“भाजपाने कधीनव्हे एवढं मुस्लिसांचं खच्चीकरण केलं आहे. मी असं का म्हणत आहे हे सांगताना मी एक उदाहरण देईन. भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आम्ही तेलंगणातील नव्या सचिवालयाचे घुमट पाडून टाकू, कारण ते मुस्लीम घुमट आहेत. दुसरीकडे अमित शाह तेलंगणात येतात आणि ४ टक्के आरक्षण रद्द करू अशी घोषणा करतात,” असा आरोप असुद्दीन ओवैसी यांनी केला.

“भाजपाने हिंदुत्वाचा अजेंडा राबवला”

ओवैसी पुढे म्हणाले, “अशापरिस्थितीत दुसरी बाजू कुठे आहे? त्यामुळे वास्तवात अशाप्रकारचं कोणतंही धार्मिक धृवीकरण नाही. भाजपाकडून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे. त्यातून त्यांना निवडणुकीत फायदा होत आहे.”

हेही वाचा : Video : “विनेश तू तर माझ्या कुटुंबातीलच…”, काँग्रेसने शेअर केला पंतप्रधानांचा ‘तो’ जुना व्हिडीओ

“भीती वाटल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसला मुस्लीम मतं”

“मुस्लिमांनी कथित सेक्युलर पक्षांना मत देण्याचा पॅटर्न कायम राहिला आहे. मोदींना हिंदू धर्मातील अनेक जातींमधून मतांचा टक्का वाढत आहे, मात्र २०१४ असो की २०१९ असो मुस्लीम समाजाच्या वाटा ६ टक्केच आहे. कर्नाटक निवडणुकीत आशा आहे म्हणून नाही तर भीती आहे म्हणून मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केलं,” असा दावा ओवैसी यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Big statement of aimim chief asaduddin owaisi on religious polarization in india pbs