IT Raid on BBC Delhi Office :  बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात सर्वेक्षण केले जात आहे. या करावाईनंतर देशात एकच खळबळ उडाली असून काँग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई म्हणजे अघोषित आणीबाणी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, याच कारवाईवर भाजपाने प्रतिक्रिया दिली असून बीबीसी तसेच काँग्रेसवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> BBC Income Tax Raid : BBC च्या कार्यालयावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप!

बीबीसीला भारतात पत्रकारिता करण्याचा…

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बीबीसीवर टीका केली. “प्राप्तिकर विभागाने कायद्याचे पालन करूनच बीबीसीच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. आज मोदी यांच्या नेतृत्वात भारताची चांगली प्रगती होत आहे. मात्र काही लोकांना हे आवडत नाही. बीबीसीला भारतात पत्रकारिता करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारतातील कायद्यांचे पालन करून ते त्यांची पत्रकारिता करू शकतात,” असे गौरव भाटीया म्हणाले.

हेही वाचा >>> BBC Income Tax Raid : BBC च्या दिल्लीतील कार्यालयावर धडकले प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, नेमकं कारण काय?

काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी तसेच दहशतवाद्यांच्या बाजूने…

“इंदिरा गांधी यांनीदेखील बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवण काँग्रेसने ठेवली पाहिजे. भारतात प्रत्येक संस्थेला कायद्याचे पालन करून काम करण्याची संधी दिली जाते. मात्र त्यासाठी त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा. काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी तसेच दहशतवाद्यांच्या बाजूने का उभा राहतो,” अशी टीका भाजपाने केली. तसेच काँग्रेस प्राप्तिकर विभागाकडून केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाची वाट का पाहात नाही. काँग्रेस आताच निष्कर्षापर्यंत का पोहोचत आहे? असे सवालही भाजपाने केले.

हेही वाचा >>> फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले “शरद पवारांनी…”

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयात सर्वेक्षण केल्यानंतर काँग्रेसकडून भाजपावर टीका केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp comment on it raid on bbc delhi office said criticizes congress prd