केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरुन खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “तुम्ही भारताविरोधात युद्ध छेडले आहे. तुमची सत्तेची भूक पाहून मला धक्का पोहोचला आहे”, अशा शब्दात इराणी यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र डागले आहे. राहुल गांधींनी भारताच्या ऐक्याला धक्का पोहोचवल्याचा आरोपही इराणी यांनी केला आहे. बंगळुरूतील ‘जन स्पंदना’ या कार्यक्रमात बोलताना इराणी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

“..तर काँग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ”, नाना पटोलेंची नितीन गडकरींना थेट ऑफर

“राहुल गांधी भारतात ऐक्य निर्माण करायला निघाले आहेत. पण त्यांनी आधी उत्तर द्यावे की भारताला तोडायची हिंमत कोणामध्ये आहे?”, असा सवाल इराणी यांनी विचारला आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसने पक्षाचे सदस्यत्व दिले, असे म्हणत इराणी यांनी अप्रत्यक्षपणे कन्हैया कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi’s T-shirt row :भाजपा अजून खाकी चड्डीतून बाहेर येत नाहीये – छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा निशाणा

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत राहुल गांधीसह इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ३ हजार ७०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. २ केंद्रशासित प्रदेश आणि १२ राज्यांमधून काँग्रेसची ही यात्रा जाणार आहे. कन्याकुमारीतून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून या यात्रेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.