Chhatrapati Shivaji Maharaj statue At Ladakh : छत्रपती शिवाजी महाराज हे लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहेत. देशभरात त्यांना मानणार तसेच त्यांचा आदर्श घेणारा मोठा वर्ग आहे. यादरम्यान भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा पुतळा चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ पँगॉन्ग तलावाच्या किनार्‍यावर १४,३०० फुट उंचीवर उभारण्यात आला आहे. लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्प्सने यासंबंधी माहिती दिली आहे. १४ कॉर्प्स (फायर अँड फ्यूरी कॉर्प्स)चे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी या पुतळ्याचे गुरूवारी (२६ डिसेंबर) रोजी अनावरण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी, १४,३०० फूट उंचीवर पँगॉन्ग त्सो (Pangong Tso) च्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शौर्य, दूरदृष्टी आणि दृढ न्यायाचे प्रतीक असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन हे लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला, एससी, एसएम, व्हीएसएम, जीओसी फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि द मराठा लाइट इन्फंट्री यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती फायर अँड फ्युरी कॉर्प्सकडून देण्यात आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने पुतळ्याच्या अनावरण करतेवेळीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरील कापड उचलले जाताना दिसत आहेत. याबरोबरच पुतळ्याशेजारी भगवा ध्वज देखील फडकताना पाहायला मिळत आहे.

भारत आणि चीनने डेमचोक आणि डेपसांग भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या करारानंतर, भारत आणि चीन या देशांनी सैन्य मागे घेण्याचे काम पूर्ण केले आहे.

हेही वाचा>> वाल्मिक कराडविरोधात फडणवीसांचा विश्वासू आमदार मैदानात; सरकारला इशारा देत म्हणाले…

पूर्व लडाखमध्ये ५ मे २०२० रोजी पँगॉन्ग लेक परिसरात हिंसक संघर्ष झाला होता, यानंतर दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या लष्करी आणि राजकीय चर्चांनंतर वाद असलेल्या भागातून दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharaj statue inaugurated by indian army on the banks of pangong tso fire and fury corps rak